अभिनेत्री रश्मिका मंदाना जखमी, पायाला मोठी दुखापत झाल्याने सिकंदर चित्रपटाचे शूटिंग खोळंबले!
Rashmika Mandanna Injured : प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या पायाला दुखापत झाली आहे. या दुखापतीमुळे तिच्या आगामी सिकंदर या चित्रपटाचे चित्रकरण थांबले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appखुद्द रशमिका मद्दानानेच माहिती दिली आहे. तिने तिला झालेल्या दुखापतीचे फोटो इन्स्टाग्राम खात्यावर पोस्ट केले आहेत. सोबतच तिने कॅप्शनमध्ये अपघात का झाला, हेही सांगितले आहे.
रश्मिका मंदानाने इन्स्टाग्रामवर एकूण चार फोटो शेअर केले आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिच्यासोबत नेमकं काय घडलं हे तिने सविस्तरपणे सांगितलंय.
तसेच लवकरच मी शूटिंगसाठी परतेन अशी आशा करूया, अशी अपेक्षाही तिने व्यक्त केलीय.
जिममध्ये माझ्या एका पायाला दुखापत झाली आहे. त्यामुळे आगामी काही दिवस कदाचित मला एकाच पायावर चालावे लागेल.
या दुखापतीमुळे सिंकदर, कुबेरा आणि थामा या चित्रपटांच्या शूटिंगसाठी मला एका पायाने लंगडतच जावे लागेल बहुकेत, असे रश्मिकाने म्हटले आहे.
यासह माझ्या दिग्दर्शकांची मी माफी मागते. मी लवकरच परतेन, अशी आशाही तिने व्यक्त केलीय.
दरम्यान, हे फोटो पाहून तिच्या चाहत्यांनी तिला लवकर बरं होण्यासाठी सदिच्छा दिल्या आहेत.तसेच तिला काळजी घेण्याचाही सल्ला दिला आहे.