Jhund : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या 'झुंड' (Jhund) या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहात होते.  या चित्रपटाचा दिग्दर्शक नागराज मंजुळेनं (Nagraj Manjule) नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये नागराजनं झुंड या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे. हा चित्रपट 4 मार्च 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. 


झुंड या चित्रपटात अमिताभ बच्चन हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. त्यांनी देखील या चित्रपटाचा पोस्टर सोशल मीडियावर शेअर केला आहे. बिग बी यांनी पोस्टमध्ये लिहिले, 'आमची टीम तुम्हाला भेटायला येत आहे. झुंड चार मार्चला होणार प्रदर्शित'






फुटबॉल प्रशिक्षकाच्या जीवनावर आधारित चित्रपट
विजय बारसे या फुटबॉल प्रशिक्षकांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. सभोवतालीच्या गरीब वस्तीत राहणाऱ्या मुलांना तयार करून त्यांनी आपली अशी फुटबॉल संघ बनवला होता. याच एकंदर कथानकावर ‘झुंड’ हा चित्रपट  आधारित असणार आहे. गेल्या वर्षी 18 जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता पण नंतर या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. 









संबंधित बातम्या


Budget 2022 Housing: घरांसाठी 48 हजार कोटींचे पॅकेज, 2023 पर्यंत 80 लाख नवी घरं बांधणार


Budget 2022 : बजेटनंतर नेटकरी म्हणातात, 'क्या करू मै मर जाऊ'; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha