Sonu Sood : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सोनू सूदनं (Sonu Sood) लॉकडाऊन दरम्यान अनेकांची मदत केली. तो सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. अनेक लोक  सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून सोनूला मदत मागतात. त्यांच्या पोस्टला रिप्लाय देऊन सोनू त्यांना मदत देखील करतो. सोनूनं केलेल्या समाजिक कार्यावर एका कवीनं कविता लिहिली आहे. ही कविता एका कार्यक्रमामध्ये त्या कवीनं सादर केली. 


शाहरुख सिद्दिकी (Sharukh Siddiqui) नावाच्या एका कवीनं एका कार्यक्रमामध्ये दरम्यान सोनूवर लिहिलेली कविता सादर केली.  ‘अगर इंसानियत हो दिल में तो शख्सियत का एक वजूद होता है, कोई आवाज़ दे कहीं पर भी वो शख्स मौजूद होता है, कहने को बहुत से पैसे वाले हैं यहां लेकिन, करोड़ो में कहीं कोई एक सोनू सूद होता है !’ अशा त्या कवितेच्या ओळी आहेत. या कवितेचा व्हिडीओ सोनूनं शेअर करुन शाहरुख सिद्दिकीचे आभार मानले आहेत. सोनूनं कवितेचा व्हिडीओ शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिले, 'भावा तू मन जिंकलसं' सोनूच्या या पोस्टला रिप्लाय करत एका युझरनं लिहिलंस 'तू अनेक भारतीयांची मनं जिंकलीस'


शाहरुख सिद्दिकीच्या कवितेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओला दोन लाख लोकांनी पाहिले आहे.@fcsonusoodmp या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.  






2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या शहीद या चित्रपटामधून सोनूनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. चित्रपटांबरोबरच तो जाहिरातींमध्ये देखील काम करतो. सोनूनं आत्तापर्यंत 70 चित्रपटांमध्ये काम केले आहे. काही दिवसांपूर्वी सोनूचा सम्राट पृथ्वीराज हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटामध्ये सोनूनं चांद बरदाई ही भूमिका साकारली आहे.  डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी सम्राट पृथ्वीराज या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं. चित्रपटांबरोबरच सोनू हा  जाहिरातींमध्ये देखील काम करतो. सोनूनं आत्तापर्यंत 70 चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचा 'फतेह' हा आगामी चित्रपट लवकर प्रदर्शित होणार आहे.


संबंधित बातम्या