Naseeruddin Shah : नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांनी प्रेषित पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. अनेक सेलिब्रिटींनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. फरहान अख्तर, कंगना रनौत यांनी या वक्तव्याबाबतचे त्यांचे मत व्यक्त केले होते. आता नुकतीच ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांनी देखील नुपूर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन केले आहे.
काय म्हणाले नसीरुद्दीन शाह?
नसीरुद्दीन शाह यांनी आपली बाजू मांडत एका मुलाखतीत सांगितले की, 'मी पंतप्रधान मोदींना लोकांमध्ये चांगली समज निर्माण करण्याचे आवाहन करू इच्छितो. हरिद्वारमधील धर्म संसदेमध्ये जे झाले ते योग्य आहे की नाही याबाबत त्यांनी मतं मांडावे. '
पुढे ते म्हणाले, 'पंतप्रधान ट्विटरवर द्वेष पसरवणाऱ्या लोकांना फॉलो करतात, त्यांना याबद्दल काहीतरी करावे लागेल. हे द्वेष वाढू नये यासाठी आवश्यक ती पावले उचलावी लागतील.' नुपूर शर्माबद्दल बोलताना नसीरुद्दीन शाह म्हणाले, 'या महिला सामान्य महिला नाहीत. त्या राष्ट्रीय वक्त्या आहेत.' एखाद्या मुस्लिमाने हिंदू देवतेवर असे प्रक्षोभक भाषण केल्याचे एकही उदाहरण मला आठवत नाही, असंही नसीरुद्दीन शाह म्हणाले.
आज AIMIM आंदोलन
प्रेषित मोहम्मद यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्याबाबत नुपूर शर्मा यांच्या बाजूने आणि विरोधामध्ये विविध भाषणबाजी आणि निदर्शने सुरू आहेत. असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष AIMIM दिल्लीतील जंतरमंतरवर नुपूर आणि नवीन जिंदाल यांच्या विरोधात आंदोलन करणार आहे, तर हिंदू महासभा नुपूर शर्माच्या समर्थनार्थ लखनऊमध्ये पायी मोर्चा काढणार आहे.
एआयएमआयएसचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी एबीपी न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत नुपूर शर्माला अटक करावी असे म्हटले होते. नुपूर शर्मांनी माफी मागितली नसून त्यांनी आपल्या वक्तव्यात इंग्रजीत 'इफ' लिहिल्याचे त्यांनी सांगितले होते.
संबंधित बातम्या