Gold Rate Today : रशिया-युक्रेन (Russia Ukraine War) यांच्यातील युद्ध सुरु होऊन 100 हून अधिक दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही युद्ध सुरुच आहे. याच युद्धाचा परिणाम जागतिक आणि भारतीय बाजारपेठेवर होताना दिसतोय. सोन्या-चांदीच्या दरात वाढ होताना पाहायला मिळत असताना आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, 24 कॅरेट सोन्याचा दर 52,250 रूपयांवर व्यवहार करत आहे. तर 1 किलो चांदीचा दर 63,480 रूपयांवर व्यवहार करत आहे. तुमच्या शहरातील आजचे दर काय आहेत ते जाणून घ्या. 

तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे आजचे दर : 

शहर सोने 1 किलो चांदीचा दर 
मुंबई  47,896 63,480
पुणे 47,896 63,480
नाशिक  47,896 63,480
नागपूर 47,896 63,480
दिल्ली 47,813 63,370
कोलकाता  47,832 63,400

तुमच्या शहराचे दर तपासा :

तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल. 

खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा :

तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता. 

महत्वाच्या बातम्या :