Sonu Sood : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सोनू सूदनं (Sonu Sood) लॉकडाऊन दरम्यान अनेकांची मदत केली. तो सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. अनेकांनी ट्विटरवर किंवा सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून सोनूकडे मदत मागितली आता नुकतीच सोनूनं एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये एका नेटकऱ्यानं सोनूला एक अजब प्रश्न विचारला आहे. या प्रश्नाचं सोनूनं मजेशिर उत्तर दिलं आहे. 


एका नेटकऱ्यानं एक मिम शेअर करून सोनू सूदला प्रश्न विचारला आहे. या मिममध्ये लिहिले आहे की, 'थंडीमध्ये शाल दान करणाऱ्या लोकांनो, उन्हाळ्यात थंड बिअर नाही देणार का?' हे मिम शेअर करून त्या नेटकऱ्यानं कॅप्शनमध्ये लिहिले, 'सोनू सूद कुठे आहेस?'. सोनूनं ही पोस्ट रिशेअर करून लिहिले, 'बिअरसोबत भुजिया चालेल का? '






सोनूचे हे आगामी चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीस
सोनू सध्ये साऊथ अफ्रिकेमध्ये MTV Roadies Season 18 चे शूटिंग करत आहेत. त्याचे  'फतेह' आणि 'पृथ्वीराज' हे आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या शहीद या चित्रपटामधून सोनूनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. चित्रपटांबरोबरच तो जाहिरातींमध्ये देखील काम करतो. सोनूनं आत्तापर्यंत 70 चित्रपटांमध्ये काम केले आहे.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha