Aathva Rang Premacha : चिरंतन राहणाऱ्या प्रेमावर भाष्य करणारा 'आठवा रंग प्रेमाचा' (Aathva Rang Premacha) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) आणि विशाल आनंद ही फ्रेश जोडी या सिनेमाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
'आठवा रंग प्रेमाचा' या सिनेमाचे नुकतेच एक पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. हा सिनेमा 17 जूनला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. खुशबू सिन्हा यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. रिंकू राजगुरू सोबत विशाल आनंद हा नव्या दमाचा अभिनेता या सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे.
'आठवा रंग प्रेमाचा' या सिनेमात आजच्या काळातली फ्रेश कथा प्रेक्षकांना पाहता येणार आहे. प्रेमाचे अनेक रंग असतात. त्यातला आठवा रंग कोणता? याची उत्सुकता या सिनेमाच्या पोस्टरनं निर्माण केली आहे. अतिशय रंजक असं हे पोस्टर आहे. त्यामुळे आठवा रंग प्रेमाचा प्रेक्षकांवर भूल पाडेल यात शंका नाही.
संबंधित बातम्या
Ranbir-Alia Wedding : ना 14 ना 17 एप्रिल... 'या' दिवशी आलिया-रणबीर घेणार सात फेरे
TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
World Television Premiere : ब्लॉकबस्टर 'पावनखिंड'सिनेमाचा 'या' दिवशी होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha