Mushrooms Can Talk : मशरुम एकमेकांशी संवाद साधू शकतात. त्यांच्याकडे  50 शब्दांचा शब्दकोश आहे, त्या 50 शब्दांच्या आधारे ते एकमेकांशी बोलू शकता. यावर संशोधन केल्यानंतर संशोधकांना मशरुम एकमेकांशी बोलत असल्याचा दावा केला आहे. हे अजब जरी असले तरी संशोधनातून समोर आले आहे. प्राध्यापक अँड्र्यू अॅडमात्स्की यांनी याबाबतची माहिती दिली आहे.  गार्डियनमध्ये याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे. 


आपल्याला देखील माहित आहे की झाडांना, वनस्पतींना जीवन आहे. चांगले खत आणि पाणी मिळाल्यानंतर झाडे टवटवीत होतात. परंतू, कोणतीही बुरशी बोलू शकते हे ऐकायला जरा विचित्र वाटते. पण एका अभ्यासानुसार, प्रोटीनचा समृद्ध स्रोत मानले जाणारं मशरुम आपापसात बोलू शकते. इतकंच नाही तर त्यांची स्वतःचा 50 शब्दांची डिक्शनरी आहे. यामाध्यमातून ते एकमेकांशी बोलत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. बुरशीच्या चार प्रजातींच्या विद्युत क्रियांवर केलेल्या अभ्यासात हे सांगण्यात आले आहे. अभ्यासानुसार, मशरुमचे विद्युत आवेग मानवी भाषेसारखेच आहेत. हे संशोधन युनिव्हर्सिटी ऑफ द वेस्ट ऑफ इंग्लंडचे प्रोफेसर अँड्र्यू अदामात्स्की यांनी केले आहे.


रॉयल सोसायटी ओपन सायन्समध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात याबाबतची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, याबाबत बोलताना प्रोफेसर अँड्र्यू यांनी म्हटले की, बुरशीच्या स्पायकिंग पॅटर्न आणि मानवाच्या भाषेमध्ये संबंध आहे की नाही याबद्दल कोणतीही माहिती नाही. परंतू, बुरशी एकमेकांशी संवाद साधू शकतात. अँड्र्यू यांचा दावा आहे की,  बुरशीमध्ये मेंदू आणि चेतना दोन्ही असतात. त्यांच्याकडे 50 शब्दांचा शब्दकोश आहे. ते बोलण्यासाठी यापैकी 15 ते 20 शब्दांचाच वापर करतात. 


मशरुम एकमेकांशी नेमकं काय बोलत असतील याबाबत प्राध्यापक अँड्र्यू यांनी माहिती दिली. प्रत्येक बुरशीजन्य शब्दाची सरासरी लांबी 5.97 अक्षरे असते. म्हणजेच मानवाच्या शब्दांपेक्षा किंचित मोठी असते. अभ्यासात असे सांगण्यात आले आहे की, मशरुम आपापसात हवामान आणि आगामी धोक्यांशी संबंधित एकमेकांना माहिती देतात. इलेक्ट्रिक अ‍ॅक्टिव्हिटी पॅटर्नचे विश्लेषण करुन संशोधकांनी हा निष्कर्ष काढला आहे. तथापी, सर्व शास्त्रज्ञ ते पूर्णपणे स्वीकारत नाहीत. गार्डियनच्या वृत्तानुसार, एक्सेटर विद्यापीठाचे डॅन बीबर म्हणाले की, यावर अधिक संशोधन आवश्यक आहे. इलेक्ट्रिक क्रियांना भाषा म्हणणे खूप घाईचे होईल असेही डॅन बीबर यांनी म्हटले आहे.


महत्त्वाच्या बातम्या: