एक्स्प्लोर

Sonu Sood : कोमातून बाहेर यायला सोनू सूदनं केली मदत, बरं झाल्यावर घेतली अभिनेत्याकडे धाव!

सोनूनं नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याच्यासोबत एक लहान मुलगी आणि एक व्यक्ती दिसत आहे. ते दोघे सोनूला भेटण्यासाठी आले होते.

Sonu Sood : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सोनू सूदनं (Sonu Sood) लॉकडाऊन दरम्यान अनेकांची मदत केली. तो सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असतो. अनेकांनी ट्विटरवर किंवा सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून सोनूकडे मदत मागितली. सोनूच्या सामाजिक कार्याचे अनेक जण कौतुक करत आहेत. सोनूनं नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याच्यासोबत एक लहान मुलगी आणि एक व्यक्ती दिसत आहे. ते दोघे सोनूला भेटण्यासाठी आले होते. सोनूनं त्या दोघांसोबतचा फोटो पोस्ट करुन खास कॅप्शन दिलं. 

सोनू सूदनं तेलंगना येथील एका व्यक्तीची मदत केली आहे. काही दिसांपूर्वी हा व्यक्ती कोमामध्ये गेला होता. या व्यक्तीचं नाव राम प्रसाद भंडारी आहे. सोनूनं शेअर केलेल्या रामच्या फोटोमध्ये तो एका बाइकवर बसलेला दिसत आहे. या बाइकवर सोनू सूद रियल हीरो असं लिहिलेलं दिसत आहे. तर रामच्या आणि त्याच्या मुलीच्या टी-शर्टवर सोनू सूदचा फोटो दिसत आहे. 

नाव राम प्रसाद भंडारी आणि त्यांच्या मुलीसोबतचा फोटो शेअर करुन सोनूनं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'तेलंगना येथील  राम प्रसाद भंडारी आणि त्यांची मुलगी मला भेटायला माझ्या घरी आली होती. त्यांना भेटल्यानंतर मला खूप चांगलं वाटलं. हा व्यक्ती काही दिवसांपूर्वी कोमामध्ये गेला होता. आम्ही त्यांची मदत करु शकलो त्यामुळे त्यांचा जीव वाचला. राम प्रसाद भंडारी यांच्या मुलीच्या डोळ्यांमध्ये आनंद दिसत होता. हे क्षण आम्हाला चांगलं काम करायला प्रेरित करतात.' सोनूनं शेअर केलेल्या या फोटोला कमेंट करुन अनेक नेटकऱ्यांनी त्याच्या कामाचं कौतुक केलं आहे. अभिनेता सुनील शेट्टीनं देखील सोनूच्या या पोस्टवर कमेंट केली आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sonu Sood (@sonu_sood)

सोनूचे चित्रपट

'फतेह' हा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या शहीद या चित्रपटामधून सोनूनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. चित्रपटांबरोबरच तो जाहिरातींमध्ये देखील काम करतो. सोनूनं आत्तापर्यंत 70 चित्रपटांमध्ये काम केले आहे. 

हेही वाचा:

Sonu Sood : 'प्लिज एका अभिनेत्रीसोबत माझं लग्न लावून दे...'; चाहत्याची अजब डिमांड, सोनूचं मजेशीर उत्तर

महत्त्वाच्या बातम्या

Sagar Karande Post On Anushree Mane: अनुश्रीनं घर घेताच सागर कारंडे आवर्जून भेटला; बिग बॉसच्या घरातलं गोड नातं टिकवत केली खास पोस्ट; VIDEO
अनुश्रीनं घर घेताच सागर कारंडे आवर्जून भेटला; बिग बॉसच्या घरातलं गोड नातं टिकवत केली खास पोस्ट; VIDEO
Sachin Goswami on Maharashtrachi Hasyajatra: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोबत घडलेला घाणेरडा प्रकार पाहताच दिग्दर्शकाची तळपायाची आग मस्तकात; सचिन गोस्वामींची फेसबुक पोस्ट चर्चेत
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोबत घडलेला घाणेरडा प्रकार पाहताच दिग्दर्शकाची तळपायाची आग मस्तकात; सचिन गोस्वामींची फेसबुक पोस्ट चर्चेत
मुंबईत महानायकांच्या घरात शिरलं पावसाचं पाणी, पण नेत्यांपासून नटांपर्यंत सगळेच गप्प, रोहित पवारांचा टोला  
मुंबईत महानायकांच्या घरात शिरलं पावसाचं पाणी, पण नेत्यांपासून नटांपर्यंत सगळेच गप्प, रोहित पवारांचा टोला  
Panchayat 5 OTT Release: बोहल्यावर चढणार ‘सचिव जी’, उपप्रधान होण्यासाठी रंगणार मोठा संघर्ष; ‘पंचायत 5’ कधी येणार?
बोहल्यावर चढणार ‘सचिव जी’, उपप्रधान होण्यासाठी रंगणार मोठा संघर्ष; ‘पंचायत 5’ कधी येणार?

व्हिडीओ

Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Rain Updates: मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान खात्याकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा, विकेंडला रेड अलर्ट
मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान खात्याकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा, विकेंडला रेड अलर्ट
Maharashtra Live blog updates: मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी
Maharashtra Live blog updates: मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी
Eknath Shinde Health: मोठी बातमी: एकनाथ शिंदेंना कामाचा अतिताण, उपचारासाठी ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल
मोठी बातमी: एकनाथ शिंदे अचानक रुग्णालयात दाखल, डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु
RBI : आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
Tukaram Mundhe: मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
Embed widget