एक्स्प्लोर

सोनू निगम म्हणतो, माझ्या मुलाने गायक व्हावं पण भारताबाहेर

सोनू आणि भारतातल्या म्युझिक कंपन्या यांच्यात बराच झगडा झाला. सोनूचा आवाज उत्तम असूनही त्याला काही वर्षापासून गाणी मिळेना झाली.

मुंबई : आपल्याला कसे काय अनुभव येतात तसं आपण आपलं मत बनवत असतो. मग ते मत आपल्या शेजाऱ्यांबद्दल असेल.. किंवा मित्राबद्दल.. सहकाऱ्यांबद्दल.. राज्याबद्दल.. देशाबद्दल. अनेकदा आपल्या शेजाऱ्यांशी वाद होतो. दोन भावात भांडणं होतात. घरं तुटतात. पण असं होत असलं तरी कोणी देशाला नावं ठेवत नाहीत. प्रत्येकाला आपला देश प्यारा असतो. आपली मातृभूमी प्यारी असते. पण इथे एक अपवाद आहे. तो अपवाद आहे हिंदी इंडस्ट्रीतला एव्हरग्रीन आवाजा असलेला गायक सोनू निगम.

सोनू निगम गेल्या काही वर्षापासून सतत चर्चेत आहे. आधी त्याने गाण्याच्या बाबतीत राईट्सचा मुद्दा काढला आणि मग बड्या लोकांनी त्याला गाण्यापासून बाहेर ठेवलं. लॉकडाऊनमध्ये सोनू पुन्हा चर्चेत आला तो आपल्या सेल्फी व्हिडिओतून. सोनू लॉकडाऊनमध्ये दुबईला होता. तिथून त्याने व्हिडिओ करत भारतात गायन क्षेत्रात असलेली मनमानी.. दबाव तंत्राचा उल्लेख केला. त्यात त्याने टी-सीरिजचं नावही घेतलं होतं. आता सोनूने नवं स्टेटमेंट दिलं आहे. त्या स्टेटमेंटमुळे प्रत्येकजण पुन्हा बुचकळ्यात पडला आहे.

सोनू लॉकडाऊन काळात दुबईला होता हे प्रत्येकाला माहित आहे. त्याचं कुटुंबही आता दुबईला असतं. त्याला एका मुलाखतीत मुलाला तू कोण बनवणार असा प्रश्न विचारल्यावर सोनूने दिलेलं उत्तर पाहता सगळे आवाक झाले. सोनू म्हणाला, माझ्या मुलाने खरंतर गायक होऊच नये असं मला वाटतं. त्याला गायक व्हायचं असेल तर निदान त्याने भारतात गायक होऊ नये. बाकी कुठेही त्याने काहीही केलं तरी चालेल. सध्या माझा मुलगा दुबईत आहे. तिथे तो टॉप गेमर आहे. त्याला काय व्हायचं ते तो ठरवेल. पण गायक व्हायचं तर भारतात त्याने गायक होऊ नये.

सोनू निगमच्या या उत्तराने मात्र सगळेच गारद झाले आहेत. सोनूच्या मुलाचं नाव निवान. सोनू आणि भारतातल्या म्युझिक कंपन्या यांच्यात बराच झगडा झाला. सोनूचा आवाज उत्तम असूनही त्याला काही वर्षापासून गाणी मिळेना झाली. अलिकडच्या काळात अनेक नवे गायक आले खरे. पण सोनूचा आवाज तसाच एव्हरग्रीन असूनही त्यला हवी तशी गाणी मिळाली नाहीत. अर्थात त्यामुळे सोनूचं फार काही अडलं नाही. त्याचे स्टेज शो.. चालू होतेच. शिवाय, प्रादेशिक भाषांमध्ये तो गातो आहेच. असं असलं तरी हिंदी इंडस्ट्रीचा असलेला त्याचा झगडा चालूच आहे. बड्या म्युझिक कंपन्यांनी सोनूला धडा शिकवायचं ठरवलं आणि त्यातून सोनू आपोआप बाहेर फेकला गेल्याचं चित्र समोर आलं. सोनू आपल्या सोशल मीडियातून बोलत असतोच. तसंच काहीसं आता झालं. पण सोनूच्या मुलााबद्दलच्या या टीप्पणीने मात्र अस्सल देशभक्त दुखावला गेला आहे हेही तितकंच खरं.

महत्त्वाच्या बातम्या

Moushumi Chatterjee Husband Jayant Chatterjee Death : ज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चॅटर्जीवर दु:खाचा डोंगर; चित्रपट निर्माते पती जयंत मुखर्जी यांचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा
ज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चॅटर्जीवर दु:खाचा डोंगर; चित्रपट निर्माते पती जयंत मुखर्जी यांचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा
Sonu Sood on Chhath Puja: छटपूजेवरुन मुंबईतलं वातावरण तापलं, मनसे आक्रमक, पण जुहूतील छटपूजा उत्सवाला सोनू सूद येणार, व्हिडीओ शेअर करत म्हणाला...
छटपूजेवरुन मुंबईतलं वातावरण तापलं, मनसे आक्रमक, पण जुहूतील छटपूजा उत्सवाला सोनू सूद येणार, व्हिडीओ शेअर करत म्हणाला...
Kavya Maran Marriage : ना सप्तपदी, ना पंडित, ना कोणते मंत्रोच्चार; 'या' विवाह पद्धतीत पार पडलं काव्या मारन-अनिरुद्ध रविचंदरचं लग्न
ना सप्तपदी, ना पंडित, ना कोणते मंत्रोच्चार; 'या' विवाह पद्धतीत पार पडलं काव्या मारन-अनिरुद्ध रविचंदरचं लग्न
Highest Paid Tv Host in India : ना सलमान, ना बिग बी! टेलिव्हिजनच्या 'या' सुपरस्टार होस्टची एका एपिसोडची कमाई ऐकून बसेल धक्का
ना सलमान, ना बिग बी! टेलिव्हिजनच्या 'या' सुपरस्टार होस्टची एका एपिसोडची कमाई ऐकून बसेल धक्का

व्हिडीओ

Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?
Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrakant Patil : बावड्यातील डी वाय पाटील महाविद्यालय कोणाच्या जागेवर उभे? आकुर्डीच्या जमिनीची माहिती काढा, सगळं समोर येईल; चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना इशारा
बावड्यातील डी वाय पाटील महाविद्यालय कोणाच्या जागेवर उभे? आकुर्डीच्या जमिनीची माहिती काढा, सगळं समोर येईल; चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना इशारा
Rinku Singh : 43 कोटी वाचवण्यासाठी दोन खेळाडूंना रिलीज करा,रिंकू सिंगला केकेआरचा कॅप्टन करा, माजी क्रिकेटपटूनं फॉर्म्युला सांगितला...
केकेआरनं 'त्या' दोघांना रिलीज करावे, 43 कोटी वाचवावे, रिंकूला कॅप्टन बनवा, सल्ला कोणी दिला?
Mantralaya Clerk Protest : मंत्रालयीन लिपिक संवर्गाचा शासनाविरोधात एल्गार, S-10 वेतनश्रेणीसाठी 18 नोव्हेंबरला निदर्शने, तर 25 नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा
मंत्रालयीन लिपिक संवर्गाचा शासनाविरोधात एल्गार, S-10 वेतनश्रेणीसाठी 18 नोव्हेंबरला निदर्शने, तर 25 नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वाधिक आनंदी मीच असेन; ओमराजेंचं वक्तव्य, आदित्य ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वाधिक आनंदी मीच असेन; ओमराजेंचं वक्तव्य, आदित्य ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया
NCP Merger : मोदींना डिलिमिटेशन विधेयक मंजूर करायचंय,15-16 मतांची त्यांना गरज, कदाचित त्यासाठी शरद पवारांच्या 8 खासदारांवर डोळा : पृथ्वीराज चव्हाण
मोदींना डिलिमिटेशन विधेयक मंजूर करायचंय,कदाचित त्यासाठी शरद पवारांच्या 8 खासदारांवर डोळा : पृथ्वीराज चव्हाण
MPSC पेपरफुटीसंदर्भात तक्रार, निवेदनं करण्यास मुदतवाढ; दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे चौकशी समितीचा निर्णय
MPSC पेपरफुटीसंदर्भात तक्रार, निवेदनं करण्यास मुदतवाढ; दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे चौकशी समितीचा निर्णय
NCP Merger: मोठी बातमी ! दिल्लीत सुप्रिया सुळे-प्रफुल पटेलांची बैठक; राष्ट्रवादीतील विलीनीकरणाच्या चर्चेला गती, सूत्रांची माहिती
मोठी बातमी ! दिल्लीत सुप्रिया सुळे-प्रफुल पटेलांची बैठक; राष्ट्रवादीतील विलीनीकरणाच्या चर्चेला गती, सूत्रांची माहिती
Gold Rate Weekly Update : सोन्याच्या दरातील घसरणीचा ट्रेंड कायम, पाच दिवसात सोनं 5000 रुपयांनी स्वस्त, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर IBJA कडून जारी
सोन्याच्या दरातील घसरणीचा ट्रेंड कायम, पाच दिवसात सोनं 5000 रुपयांनी स्वस्त, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर IBJA कडून जारी
Embed widget