Bollywood Actress Physical Harassment Incident: 'तो मागून आला अन् त्यानं माझ्या छातीला...'; रणबीर कपूरच्या एक्स गर्लफ्रेंडचा भयानक अनुभव, ढसाढसा रडू लागलेली अभिनेत्री
Bollywood Actress Physical Harassment Incident: स्टार कीड असूनही आघाडीच्या बॉलिवूड अभिनेत्रीला तिच्या आयुष्यात मोलेस्टेशनचा सामना करावा लागल्याचं तिनं कित्येकदा बोलताना सांगितलं आहे.

Bollywood Actress Physical Harassment Incident: फिल्म इंडस्ट्रीमध्ये (Film Industry) अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या सध्या तरुणांच्या गळ्यातील ताईत आहेत. त्यांची एक झलक पाहण्यासाठी त्यांचे चाहते कित्येक प्रयत्न करतात. पण, त्यापैकी अनेकजणी प्रोफेशनल आयुष्यात कमालीच्या यशस्वी आहेत. वैयक्तिक आयुष्यात मात्र त्यांनी मोठं दुःख सहन केलंय. अशीच एक स्टार किड (Star Kid) आहे, वडील सुपरस्टार असूनही तिला इंडस्ट्रीत खूप खचता खाव्या लागल्यात, पण आज तिची गणना इंडस्ट्रीतल्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये केली जाते. याच अभिनेत्रीनं तिच्यासोबतचा एक धक्कादायक अनुभव शेअर केलेला. तिच्या आयुष्यात तिला मोलेस्टेशनचा सामना करावा लागल्याचं तिनं कित्येकदा बोलताना सांगितलं आहे.
आम्ही ज्या अभिनेत्रीबाबत बोलत आहोत, तिचं नाव सोनम कपूर. नव्वदचं दशक गाजवणारा सुपरस्टार अनिल कपूर यांची मुलगी. सोनम कपूरनं रणबीर कपूरसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. याच सोनम कपूरनं तिच्या आयुष्यात तिच्यासोबत घडलेल्या खळबळजनक घटनेचा खुलासा केला. सोनमनं बोलताना सांगितलेलं की, ती लहान असतानाच तिच्यासोबत एका व्यक्तीनं अत्यंत घाणेरडं कृत्य केलेलं. एका व्यक्तीनं तिच्या ब्रेस्टला हात लावला होता.
सोनमसोबत घाणेरडं कृत्य
एका मुलाखतीत बोलताना सोनम कपूरनं सांगितलेलं की, ती तिच्या मैत्रिणींसोबत थिएटरमध्ये फिल्म पाहायला गेली होती. ही घटना ती फक्त 15-16 वर्षांची असताना घडली. सोनम म्हणाली की, "मागून एक माणूस आला आणि त्यानं माझ्या छातीला हात लावला. मी खूपच लहान होते. मी थरथर कापू लागले, माझ्यासोबत काय घडलं हेच मला कळत नव्हतं. मी तिथेच ओक्साबोक्सी रडू लागली. मी तिथेच बसून राहिली आणि संपूर्ण फिल्म पाहिली. बराच वेळ मला असं वाटलं की, मीच काहीतरी चूक केली आहे."
सोनम कपूरनं आनंद आहूजासोबत बांधली लग्नगाठ
सोनम कपूर सध्या मोठ्या पडद्यापासून दूर असली तरीसुद्धा ती कायम चर्चेत असते. सध्या ती तिच्या कुटुंबाला वेळ देत आहे. तिला एक मुलगा असून तिनं बिजनेसमन आनंद आहुजासोबत लग्न केलेलं. लग्नानंतर मात्र सोनमनं मोठ्या पडद्यापासून अंतर राखलं. सोनम कपूर आनंदसोबत रोमॅन्टिक फोटो शेअर करत असते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























