T20 world cup 2022: ऑस्ट्रेलियात पुढच्या महिन्यापासून टी-20 विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. यासाठी भारतीय संघ जोरदार तयारी करत आहे. याचदरम्यान, भारताचा कर्णधार रोहित शर्मासोबत (Rohit Sharma) कोण सलामीला येणार? याबाबत सतत चर्चा सुरु झाल्या आहेत. क्रिकेट तज्ज्ञ रोहितसोबत विराटला सलामीला पाठवण्याचा सल्ला देत आहेत. परंतु, टी-20 विश्वचषकात केएल राहुलचं (KL Rahul) सलामी करणार असल्याचं रोहित शर्मानं स्पष्ट केलंय. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यात एक टीव्ही अँकरनं रोहित शर्मासोबत काँग्रेस नेता राहुल गांधी (Rahul Gandhi) सलामीला येणार असल्याचं म्हटलंय. 


सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये टीव्ही अँकरनं म्हटलंय की, "टी-20 विश्वचषकात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मासोबत राहुल गांधी ओपनिंग करणार आहे. या स्पर्धेतील काही सामन्यात विराट कोहलीही सलामीला येण्याची शक्यता आहे." टीव्ही अँकरच्या चुकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअरही केलं जातंय.


व्हिडिओ-






 


भारतीय संघ 5 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाला रवाना होणार
इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआय टी-20 विश्वचषकासाठी निवडलेल्या खेळाडूंना 5 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाला पाठवण्याचा विचार करत आहे. ऑस्ट्रेलियामध्ये खेळाडूंना तयारीची पूर्ण संधी मिळावी, अशी बीसीसीआयची इच्छा आहे. बीसीसीआयने या संदर्भात संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याशीही चर्चा केलीय. भारतीय खेळाडू 5 ऑक्टोबरलाच ऑस्ट्रेलियात पोहोचले तर त्यांना सरावासाठी अतिरिक्त आठवडा मिळेल. आगामी टी-20 विश्वचषकात भारताचा पहिला सामना 23 ऑक्टोबरला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. यापूर्वी भारताला दोन सराव सामने खेळायचे आहेत. 


टी-20 विश्वचषकासाठी भारताचा संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल(उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, आर.अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह. 


हे देखील वाचा-