Sonam Kapoor : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूरच्या (Sonam Kapoor) कुटुंबामध्ये लवकरच एका चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. गेल्या महिन्यात सोनमनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून तिच्या प्रेग्नन्सीबाबत चाहत्यांना माहिती दिली. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये सोनमनं तिच्या प्रेग्नन्सी दरम्यान तिला येत असलेल्या अनुभवांबद्दल सांगितले. 


मुलाखतीमध्ये सोनमनं सांगितलं, 'प्रेग्नन्सीचा हा प्रवास खूप कठीण आहे. आई होण्याआधीच्या या प्रवासाबद्दल कोणी जास्त बोलत नाही. तुमचे शरीर दररोज बदलते. तुम्हाला नेहमी वेगळा अनुभव येतो. अनेक वेळा मी झोप लागत नव्हती कारण मला सारखं बाथरूमला जावे लागत होते. बऱ्याच वेळा मी दहा ते बारा तास झोपत होते. तेव्हा मला कोणीही डिस्टर्ब करत नव्हते. आई होणं हा एक प्रकारचा आशीर्वाद आहे.'






सोनमचा ब्लाइंड हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा 2011 मध्ये प्रदर्शित झालेल्या कोरियन चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटामध्ये सोनमसोबतच  पूरब कोहली आणि विनय पाठक हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत.


हेही वाचा :