हैदराबाद : सध्या अल्लू अर्जुनच्या पुष्पा-2 या चित्रपटाची सगळीकडेच चर्चा आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करताना दिसतोय. या चित्रपटातील अभिनयामुळे अल्लू अर्जुनची समस्त भारतात जोरदार चर्चा चालू आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून हा अभिनेता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. या अभिनेत्याला 13 डिसेंबरची रात्र तुरुंगात घालवावी लागली आहे. आज अल्लू अर्जुनची तुरुंगातून सुटका झाली आहे. दरम्यान, आपल्या नवऱ्याला तुरुंगाबाहेर आल्याचं बघताच अल्लू अर्जुनची पत्नी स्नेहा रेड्डी चांगलीच भावूक झाली आहे. तिचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
पत्नीने अल्लू अर्जुनला मारली मिठी
अल्लू अर्जुनची आज तुरुंगातून सुटका झाली. तुरुंगाबाहेर येताच तो आपल्या घरी गेला. घरी पोहोचताच अल्लू अर्जुनहची औक्षणही करण्यात आलं. त्यानंतर त्याने सर्वप्रथम आपल्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी मुलांना समोर पाहताच अल्लू अर्जुनने त्यांना मिठीत घेतलं. मागून त्याची पत्नीही चालत आली. आपला पती तुरुंगाबाहेर आल्याचे आणि तो सुखरुप असल्याचे दिसतच स्नेहा रेड्डीला आभाळ ठेंगणं झालं. तिने कशाचाही विचार न करता आपल्या पतीला कडकडून मिठी मारली. आपल्या नवऱ्याला पाहून स्नेहा चांगलीच भावुक झाली होती. तिचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. आपल्या पतीला समोर पाहून सेन्हाला फार आनंद झाल्याचं या व्हिडीओत दिसतंय.
अल्लू अर्जुनला तुरुंगात का राहावं लागलं?
पुष्पा-2 या चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान हैदराबाद शहरातील संध्या या थिएटरमध्ये एक प्रीमिअर ठेवण्यात आला होता. याच प्रीमियरदम्यान लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. याच गर्दीत एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या मृत्यूप्रकरणी अल्लू अर्जुनविरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर त्याला सत्र न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र या निर्णयाविरोधात अल्लू अर्जूनने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने अल्लू अर्जुनला जामीन मंजूर केला. मात्र या सर्व प्रक्रियेदरम्यान त्याला 13 डिसेंबरची रात्र तुरुंगात घालावी लागली. 18 तास तो तुरुंगात होता. त्यानंतर तो घरी येताच त्याची पत्नी भावुक झाली होती.
हात जोडून मृत महिलेबाबत दु:ख व्यक्त
दरम्यान, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आल्लू अर्जुनने मी कायद्याचे पालन करणारा नागरिक आहे, असं सांगितलं. तसेच मी पोलीस तसेच इतर यंत्रणेला पूर्णपणे सहकार्य करणार आहे. त्या दिवशी झालेली घटना फारच दुर्दैवी होती. तशी घटना व्हावी अशी आमची कोणाचीच इच्छा नव्हती. दुर्दैवाने त्या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे, असे स्पष्टीकरण अल्लू अर्जुनने दिले.
हेही वाचा :
तुरुंगाबाहेर येताच पुष्पाने मागितली माफी, रात्रभर जेलमध्ये राहिल्यानंतर सुटका, हात जोडून म्हणाला....
Allu Arjun : अल्लू अर्जुनची जेलमधून सुटका,जामीन मिळाल्यानंतर रात्रभर जेलमध्येच होता मुक्काम