हैदराबाद : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन सध्या चांगलाच चर्चेत आहे. हैद्राबादच्या संध्या थिएटरमध्ये त्याच्या पुष्पा 2 चित्रपटाच्या प्रीमिअर शोदरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी त्याच्यावर अटकेची कारवाई केली होती. या अटकेमुळे अल्लू अर्जुनला रात्री तुरुंगात घालावी लागली आहे. त्यानंतर आता त्याची सुटका झाली असून तो तुरुंगातून बाहेर आला आहे. तुरुंगातून बाहेर येताच त्याने महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. 

Continues below advertisement

तुरुंगातून येताच औक्षण 

अल्लू अर्जुनला पोलिसांनी अटक केल्यानंतर सगळीकडे त्याचीच चर्चा चालू होती. त्याला आता तुरुंगाताच राहावे लागणार का? असे विचारले जात होते. त्याचे चाहतेही चांगलेच नाराज झाले होते. मात्र कायदा सर्वांना समान असतो. त्यामुळेच त्याला एक रात्र तुरुंगात काढावी लागली आहे. त्यानंतर आज त्याची सुटका झाली आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याने माध्यमांशी संवाद साधला आहे. 

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अल्लू अर्जुन नेमंक काय म्हणाला? 

तुरुंगातून बाहेर येताच त्याने माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. मी कायद्याचे पालन करणारा नागरिक आहे. कायद्याचा मी सन्मान करतो. मी यंत्रणेला पूर्णपणे सहकार्य करणार आहे. त्या दुर्घटनेत ज्या महिलेचा मृत्यू झाला, त्या महिलेबाबत मी दु:ख व्यक्त करतो. मी त्या कुटुंबाच्या दु:खात सहभागी आहे. ती दुर्घटना फार दुर्दैवी होती. आम्ही चित्रपट पाहायला गेलो होतो. घडलेली दुर्घटना ही मुद्दामहून घडवून आणलेली नव्हती. त्यामागे कोणताही हेतू नव्हता.  दुर्दैवी अपघात झाल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. घडलेल्या दुर्घटनेबाबत आम्हाला दु:ख आहे. आम्ही त्याबाबत क्षमा मागतो, अशी प्रतिक्रिया अल्लू अर्जुनने दिली.    

Continues below advertisement

14 दिवसांची मिळाली होती कोठडी

 प्रीमियर शोदरम्यान, महिलाचा मृत्यू झाल्यानंतर अल्लू अर्जुनविरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर त्याला सत्र न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. या निर्णयाविरोधात त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर त्याला जामीन मंजूर करण्यात आला होता. मात्र जामीन मंजूर झालेला असूनही त्याला तुरुंगात एक रात्र काढावी लागली. त्यानंतर आता अल्लू अर्जुन तुरुंगातून बाहेर आला आहे.

हेही वाचा :

Allu Arjun Bail : झुकेगा नही साला! न्यायालयीन कोठडी मिळताच तासाभरात अल्लू अर्जुनला अंतरिम जामीन मंजूर 

Allu Arjun get 14 Days Judicial Custody : अल्लू अर्जुनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Allu Arjun : अल्लू अर्जुनची जेलमधून सुटका,जामीन मिळाल्यानंतर रात्रभर जेलमध्येच होता मुक्काम