एक्स्प्लोर

Smart Sunbai Marathi Movie: हसवेल, गुंतवेल आणि शेवटी एक गुपित उघड करेल; गाव-शहराची भन्नाट जुगलबंदी असलेल्या 'स्मार्ट सुनबाई'चा टीझर OUT

Smart Sunbai Marathi Movie: 'स्मार्ट सुनबाई' चित्रपटाचा टिझर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आला.

Smart Sunbai Marathi Movie: एका अनोख्या, रंगेल आणि गुंतागुंतीच्या जगात घेऊन जाणारा नवा मराठी चित्रपट (Marathi Movie) 'स्मार्ट सुनबाई' (Smart Sunbai) चित्रपटसृष्टीत नवा धमाका करायला सज्ज झालेला आहे. नुकताच या सिनेमाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीस आलाय. शिवाजी दोलताडे दिग्दर्शित आणि गोवर्धन दोलताडे, गार्गी निर्मित, कार्तिक दोलताडे पाटील सह निर्मित 'स्मार्ट सुनबाई'चा टीझर पाहिल्यावर एक गोष्ट नक्की लक्षात येते, ते म्हणजे, ही एक शहरी आणि ग्रामीण मनांची मस्तीखोर जुगलबंदी आहे, जिथे रहस्याचा थर आणि प्रेमाचा स्पर्श आहे. 

विशेष म्हणजे, या चित्रपटाचा टिझर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आला, त्यांनी या चित्रपटाच्या संकल्पनेचं, कलाकारांचं तसेच दिग्दर्शकाच्या प्रयत्नांचं मनापासून कौतुकही केलं. टिझरमधील भावनिक आणि विनोदी रंगांची संगम साधणारी झलक पाहून त्यांनी "हा सिनेमा नक्कीच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करेल", असा विश्वास व्यक्त केला.

हा टीझर प्रेक्षकांना एका अप्रतिम स्थळावर घेऊन जातो. सुंदर, रमणीय आणि निसर्गरम्य लोकेशन्समध्ये चित्रित झालेला हा चित्रपट केवळ डोळ्यांची मेजवानीच नाही तर भावनांचा, हास्याचा आणि रोमान्सचा परिपूर्ण संगम सादर करतो. शहरातील आधुनिक स्त्रिया आणि गावातील पारंपरिक स्त्रिया यांच्या मजेशीर जुगलबंदीने भरलेला हा सिनेमा प्रेक्षकांना हसवणार, गुदगुल्या करणार आणि शेवटी थोडं विचार करायलाही भाग पाडणार आहे. टीझरमध्ये दिसलेले काही क्षण प्रेक्षकांना दडलेल्या काही गुपितांचा सुगावा देतात. हे रहस्य नेमकं काय आहे? या प्रश्नांची उत्तरे चित्रपटात सोडवली जातील.

या सिनेमात मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत आणि लोकप्रिय कलाकारांची प्रभावी फळी एकत्र दिसणार आहे. संतोष जुवेकर,रोहन पाटील , भाऊ कदम, किशोरी शहाणे , सायली देवधर ,मोहन जोशी, दीपक शिर्के, प्राजक्ता हनमघर , प्राजक्ता गायकवाड , उषा नाईक , अंशुमन विचारे , स्नेहल शिदम, विनम्र बाबल,भक्ती चव्हाण, दीप्ती सोनवणे, अनुष्का बेनके, पूजा राजपूत, सुचिका जोशी, विद्या मेहेत्रे , मोनिका बंगाळ ,आर्या सकुंडे , वैशाली चौधरी , सपना पवार , कांचन चौधरी. या सर्व कलाकारांची एकत्रित उपस्थितीच ‘स्मार्ट सुनबाई’ ला भव्यतेची उंची देणार असून, त्यांच्या परफॉर्मन्सची अनोखी केमिस्ट्रीच या चित्रपटाची खरी ताकद ठरणार आहे.

चित्रपटाची कथा आणि लेखन योगेश शिरसाट यांनी प्रभावीपणे साकारले असून, विजय नारायण गवंडे आणि साई–पियुष यांनी या चित्रपटाला सुरेल संगीताची साथ दिली आहे. गीतकार वैभव देशमुख आणि अदिती द्रविड यांच्या सुंदर लेखणीतून उमटलेली गाणी, तर अजय गोगावले, वैशाली माढे, आनंदी जोशी, सावनी रवींद्र आणि उर्मिला धनगर यांच्या मधुर आवाजानं सजलेली ही संगीतमय मेजवानी 'स्मार्ट सुनबाई'ला एक वेगळीच ओळख देणार आहे. हा सिनेमा 21 नोव्हेंबर 2025 पासून थिएटरमध्ये पाहता येणार आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Welcome To The Jungle box office collection: 'वेलकम टू द जंगल'ची बॉक्स ऑफिसवर हवा, 2 कोटी कमावताच बजेट वसूल; कॉमेडी सिनेमाने किती कमावले?
'वेलकम टू द जंगल'ची बॉक्स ऑफिसवर हवा, 2 कोटी कमावताच बजेट वसूल; कॉमेडी सिनेमाने किती कमावले?
Bigg Boss Marathi 7: 'बिगबॉस मराठी 7' च्या कास्टिगसंदर्भात मेकर्सकडून मोठी अपडेट; सावधानतेचा इशारा देत केली पोस्ट
'बिगबॉस मराठी 7' च्या कास्टिगसंदर्भात मेकर्सकडून मोठी अपडेट; सावधानतेचा इशारा देत केली पोस्ट
Actor Rajesh Sharma Hospitalised: प्रभासच्या सिनेमाच्या शुटिंगमध्ये भयंकर घडलं; 'बजरंगी भाईजान' फेम अभिनेत्याला विषारी किड्याचा चावा, पायांवर फोड्या अन्...
प्रभासच्या सिनेमाच्या शुटिंगमध्ये भयंकर घडलं; 'बजरंगी भाईजान' फेम अभिनेत्याला विषारी किड्याचा चावा, पायांवर फोड्या अन्...
Sairat Fame Actor Arbaz Shaikh Viral Video: तुकाराम मुंढेंनी वॉर्निंग देऊनही सोलापूरच्या हॉस्पिटलनं तेच केलं, सैराटमधील सल्याला वडिलांसाठी मेडिकलमधून 40 हजारांची औषधं घेण्याची सक्ती, FDA कारवाई करणार?
तुकाराम मुंढेंनी वॉर्निंग देऊनही सोलापूरच्या हॉस्पिटलनं तेच केलं, सैराटमधील सल्याला वडिलांसाठी मेडिकलमधून 40 हजारांची औषधं घेण्याची सक्ती, FDA कारवाई करणार?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'कर्नाटक सरकार 40 टक्के कमिशन आणि 'पे सीएम' च्या एका घोषणेवर गेलं, महाराष्ट्रात त्यापेक्षाही भयानक परिस्थिती..' मिसिंग लिंक अन् सीएम फडणवीसांच्या त्या वक्तव्यावर पृथ्वीराज बाबा काय काय म्हणाले?
'कर्नाटक सरकार 40 टक्के कमिशन आणि 'पे सीएम' च्या एका घोषणेवर गेलं, महाराष्ट्रात त्यापेक्षाही भयानक परिस्थिती..' मिसिंग लिंक अन् सीएम फडणवीसांच्या त्या वक्तव्यावर पृथ्वीराज बाबा काय काय म्हणाले?
Sairat Fame Actor Arbaz Shaikh Viral Video: तुकाराम मुंढेंनी वॉर्निंग देऊनही सोलापूरच्या हॉस्पिटलनं तेच केलं, सैराटमधील सल्याला वडिलांसाठी मेडिकलमधून 40 हजारांची औषधं घेण्याची सक्ती, FDA कारवाई करणार?
तुकाराम मुंढेंनी वॉर्निंग देऊनही सोलापूरच्या हॉस्पिटलनं तेच केलं, सैराटमधील सल्याला वडिलांसाठी मेडिकलमधून 40 हजारांची औषधं घेण्याची सक्ती, FDA कारवाई करणार?
Anjali Damania on Devendra Fadnavis: अहंकार... फक्त आणि फक्त अहंकार; मिसिंग लिंकची दुर्दशा उघड्या डोळ्याने महाराष्ट्र पाहत असताना “भाडे के टट्टू” म्हणणं शोभतं का मुख्यमंत्र्यांना? अंजली दमानियांचा हल्लाबोल
अहंकार... फक्त आणि फक्त अहंकार; मिसिंग लिंकची दुर्दशा उघड्या डोळ्याने महाराष्ट्र पाहत असताना “भाडे के टट्टू” म्हणणं शोभतं का मुख्यमंत्र्यांना? अंजली दमानियांचा हल्लाबोल
Prithviraj Chavan on Missing Link: मिसिंग लिंकच्या कामात सुरक्षेबाबत तडजोड झालेय, महायुती सरकारच्या काळात कंत्राटदरांकडून 40 टक्के कमिशनचा पायंडा : पृथ्वीराज चव्हाण
मिसिंग लिंकच्या कामात सुरक्षेबाबत तडजोड झालेय, महायुती सरकारच्या काळात कंत्राटदरांकडून 40 टक्के कमिशनचा पायंडा : पृथ्वीराज चव्हाण
Iran War Live Update: इराणवर सलग दुसऱ्या दिवशी अमेरिकेच्या भीषण हवाई हल्ल्याने जगाच्या पाठीवर पुन्हा एकदा थरकाप; मार्केटला घरघर, इराणकडून बहरिन, कुवेतमधील एअरबेस टार्गेटवर
इराणवर सलग दुसऱ्या दिवशी अमेरिकेच्या भीषण हवाई हल्ल्याने जगाच्या पाठीवर पुन्हा एकदा थरकाप; मार्केटला घरघर, इराणकडून बहरिन, कुवेतमधील एअरबेस टार्गेटवर
Sanjay Raut and Sharad Pawar: ज्या गद्दाराने आपलं सरकार पाडलंय त्याच्या छताखाली जाऊन बैठका घेतल्याने मोठ्या नेत्यांची विश्वासार्हता कमी होते; संजय राऊतांकडून शरद पवारांवर शरसंधान
ज्या गद्दाराने आपलं सरकार पाडलंय त्याच्या छताखाली जाऊन बैठका घेतल्याने मोठ्या नेत्यांची विश्वासार्हता कमी होते; संजय राऊतांकडून शरद पवारांवर शरसंधान
Chanakya Niti: विवाहित महिलांनो, 4 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा! नातं आयुष्यभर टिकवून ठेवण्यासाठी मदत होईल, चाणक्यनीती...
विवाहित महिलांनो, 4 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा! नातं आयुष्यभर टिकवून ठेवण्यासाठी मदत होईल, चाणक्यनीती...
Hingoli Crime News: दुसऱ्या लग्नासाठी नटलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा 'तो' फोटो फेसबुकवर आला अन् पहिल्या पत्नीच्या पायाखालची जमीन सरकली; लग्नमंडपात जाताच नवऱ्याचं संतापजनक कृत्य
दुसऱ्या लग्नासाठी नटलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा 'तो' फोटो फेसबुकवर आला अन् पहिल्या पत्नीच्या पायाखालची जमीन सरकली; लग्नमंडपात जाताच नवऱ्याचं संतापजनक कृत्य
Embed widget