Sidharth-Kiara Wedding Anniversary: 7 फेब्रुवारी रोजी सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) ​​आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) यांनी त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला. आता या सेलिब्रेशनचे अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांचे 7 फेब्रुवारी 2023 रोजी जैसलमेरमधील सूर्यगड येथे मोठ्या थाटामाटात डेस्टिनेशन वेडिंग पार पडले. आता त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यामुळे या जोडप्याने त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस कसा साजरा केला याची उत्सुकता चाहत्यांना लागून राहिली होती. सिद्धार्थ आणि कियारा हे शेरशाहा या चित्रपटात एकत्र झळकले होते. त्यानंतर त्यांनी रिअल लाईफमध्येही त्यांनी एकमेकांचा जोडीदार म्हणून स्विकार केला. 


नुकतच या जोडप्याच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. त्यानिमित्ताने या दोघांनीही दिल्लीत त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला. सिद्धार्थ आणि कियारा यांनी त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस कुटुंब आणि मित्रांसोबत दिल्लीत साजरा केला. या सेलिब्रेशनचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडिओमध्ये कियारा आणि सिद्धार्थ दोघेही त्यांच्या मित्र मैत्रणींसोबत आणि कुटुंबियांसोबत आनंद घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. 






दोघेही मॅचिंग आऊटफिटमध्ये


या दोघांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये हे कपल सेल्फी घेताना दिसत आहे. यावेळी दोघेही मॅचिंग आउटफिट्समध्ये दिसले. एकीकडे कियाराने ब्लॅक कलरचा ड्रेस घातला आहे, तर सिद्धार्थही ब्लॅक कलरच्या थ्री पीस सूटमध्ये दिसला. या फोटोंमध्ये दोघेही एकमेकांसोबत खूप सुंदर दिसत होते. ज्यावर त्यांच्या चाहत्यांनी देखील लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला. नुकताच सिद्धार्थ आणि कियाराने त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये दोघे एकत्र  घोडेस्वारी करताना दिसले होते. 






'या' चित्रपटांमध्ये झळकणार कियारा अडवाणी


 कियारा अडवाणी लवकरच साऊथ स्टार राम चरणसोबत 'गेम चेंजर' या पॉलिटिकल ॲक्शन थ्रिलर चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात कियारा भरपूर ॲक्शन करताना दिसणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच कियारा रणवीर सिंगसोबत 'डॉन 3'मध्येही दिसणार आहे.


दिशा पटानीसोबत सिद्धार्थ करणार स्क्रिन शेअर


योद्धा या ॲक्शन थ्रिलर चित्रपटामुळे सिद्धार्थ बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे.करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि दिशा पटानी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटात राशी खन्नाही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.


ही बातमी वाचा : 


Lal Salaam Box Office Collection Day 3: 'लाल सलाम'ला विकेंडचाही फायदा नाहीच, बॉक्स ऑफीसवर नाही चालली रजनीकांतची जादू