Lal Salaam Box Office Collection Day 3: सुपरस्टार रजनीकांत (Rajnikanth) यांच्या 'लाल सलाम' (Lal Salam) या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षक त्याची वाट पाहत होते. 9 फेब्रुवारीला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट पाहण्यासाठी अनेक जण जात आहेत. मात्र रिलीजपूर्वीच या चित्रपटाबाबत जी चर्चा निर्माण झाली होती ती रिलीज झाल्यानंतर मागे पडत असल्याचं पाहायला मिळालं. चित्रपटाची दोन दिवसांची कमाई आणि तिसऱ्या दिवसाची सुरुवातीची आकडेवारी पाहता वीकेंडचाही फायदा चित्रपटाला मिळत नसल्याचं चित्र स्पष्ट झालं.
SACNL च्या अहवालानुसार, 'लाल सलाम'ने वीकेंड असूनही पहिल्या दिवशी 3.55 कोटी रुपये आणि दुसऱ्या दिवशी 3.23 कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाच्या तिसऱ्या दिवसाचीही सुरुवातीची आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीनुसार 'लाल सलाम'ने आतापर्यंत केवळ 2.2 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासह तीन दिवसांत चित्रपटाचे एकूण कलेक्शन केवळ 9 कोटींवर पोहोचले आहे.
'लाल सलाम'चे तीन दिवसांचे कलेक्शन
Day 1- 3.55 कोटी
Day 2 - 3.23 कोटी
Day 3 - 2.2 कोटी
एकूण - 9 कोटी
रजनीकांत यांच्या मुलीने केले चित्रपटाचे दिग्दर्शन
'लाल सलाम' तामिळ, तेलगू, हिंदी, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांत हिने केले आहे. चित्रपटाद्वारे ऐश्वर्याने 9 वर्षांनंतर दिग्दर्शनाच्या दुनियेत पुनरागमन केले आहे. 'लाल सलाम' या स्पोर्ट्स ड्रामा चित्रपटात विष्णू विशाल आणि विक्रांत मुख्य भूमिकेत दिसले आहेत. तर रजनीकांत या चित्रपटात कॅमिओ करताना दिसत आहेत. याशिवाय विघ्नेश, लिव्हिंगस्टोन, सेंथिल, जीविता, केएस रविकुमार आणि थंबी रामय्या ही स्टारकास्ट देखील या चित्रपटात झळकली. या चित्रपटात कॅमिओ करण्यासाठी रजनीकांतने एक कोटी रुपये घेतले आहेत.
लाल सलाम सिनेमा कसा आहे?
रजनीकांत यांचा आगामी लाल सलाम हा सिनेमा स्पोर्ट्सशी निगडीत आहे. यामध्ये अभिनेते रजनीकांत मुख्य भूमिकेत दिसत आहेत. याशिवाय विष्णू विशाल आणि विक्रांतही सिनेमात झळकले आहेत. लाल सलाम हा सिनेमा रजनीकांत यांच मुलगी ऐश्वर्या यांनी दिग्दर्शित केला आहे. लाइका प्रोडक्शनच्या सुबास्करन अल्लिराजाह हे या सिनेमाचे निर्माते आहेत. हा सिनेमा 9 फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला.