Gondia News गोंदिया : महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला गोंदिया (Gondiya)आणि गडचिरोली (Gadchiroli) या दोन जिल्ह्यांची ओळख पूर्वी नक्षलग्रस्त  (Naxal) जिल्हे म्हणून होती. मात्र या दोन्ही जिल्ह्याची ही ओळख आम्ही पुसून टाकली आहे. आज या दोन्ही जिल्ह्यातून आम्ही नक्षलवाद संपवला असून सरकारचा आणि पोलिसांचा धाक निर्माण करण्याचं काम केलं असल्याचे व्यक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांनी केले आहे.  आज गोंदिया जिल्ह्यात स्वर्गीय मनोहरभाई पटेल यांच्या जयंती आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या भूमिपूजन निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलतांना त्यांनी त्यांनी हे भाष्य केले आहे. 


आम्ही नक्षलवाद संपवला


राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या हत्येच्या आणि गोळीबारांच्या घटनेने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या मुद्दावरून राज्याचे राजकारण देखील तापले असून दररोज आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहे. या हल्ल्यांमुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरून विरोधकांनी महायुती सरकारवर चांगलाच निशाना साधला आहे. विरोधकांनी गृहमंत्री यांचा राजीनामा देखील मागीतला होता. अशातच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोंदियात नक्षलवाद संपला नाही तर आम्ही संपवला आहे, असे वक्तव्य केले. गोंदिया आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांची ओळख नक्षलग्रस्त जिल्हे म्हणून होती, मात्र या दोन जिल्ह्यातून आम्ही नक्षलवाद संपवला असल्याचे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. 


विदर्भाशी आपुलकीचे नाते


मी विदर्भाच्या भूमीशी गेल्या कित्येक वर्षांपासून जुळलेलो आहे. मी विदर्भातील गडचिरोली जिल्ह्याचा पालकमंत्री असल्याने माझे विदर्भाशी आपुलकीचे नाते आहे. विदर्भात शिक्षणाची गंगा पोहोचवणाऱ्या शिक्षण महर्षी स्वर्गीय मनोहर भाई पटेल यांनी शिक्षण क्षेत्रात मोठे कार्य केले आहे. आज त्यांच्या 118व्या जयंती निमित्त त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करतो. मी एक सर्वसामान्य शेतकऱ्यांचा मुलगा असल्याने मी समाजातील शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांचा आणि सर्वसामान्यांच्या वेदना समजू शकतो. आज मंचावर उपस्थित उपराष्ट्रपती यांचा देखील एका छोट्याश्या गावापासून ते उपराष्ट्रपती पर्यंतचा  प्रवास आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. आज राज्यात आणि देशात सर्वच क्षेत्रात प्रगती होत आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल उभारण्याचा आपण निर्णय घेतला आहे. महात्मा ज्योतिबा फुले योजनेची लिमिट पाच लाखापर्यंत केली असून त्याच्या सर्व अटी शर्ती आपण रद्द केले असल्याचे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.  



शिक्षण महर्षी स्वर्गीय मनोहरभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज 11 फ्रेबुवारीला गोंदिया भंडारा जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला  उपराष्ट्रपती जगदीप धनखड राज्यपाल रमेश बैस  यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आदींसह इतर प्रमुख नेते उपस्थित झाले आहेत.या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. 


इतर महत्वाच्या बातम्या