एक्स्प्लोर

Matka King: सिद्धार्थ जाधवची नागराज मंजुळेंसाठी खास पोस्ट, भावुक होत म्हणाला, माझ्या आयुष्यातली पहिली वेब सिरीज...

Siddharth Jadhav First Web Series Experience: मटका किंगनिमित्त सिद्धार्थ जाधवची वेब सिरीद विश्वात पाऊल. नागराज मंजुळेंसाठी लिहिली खास पोस्ट.

Siddharth Jadhav Shares Emotional Note for Nagraj Manjule: नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित 'मटका किंग' (Matka King) ही वेब सिरीज सध्या प्रचंड चर्चेत आहे. या वेब सिरीजमध्ये मुख्य नायक म्हणून विजय वर्माने (Vijay Verma) ब्रिज भट्टी ही भूमिका साकारली आहे.  या सिरीजमध्ये इतर दमदार कलाकारांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या सिरीजमध्ये मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधवचीही (Siddharth Jadhav) महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्यानं अलिकडेच या वेब सिरीजसाठी काम करत असतानाची झलक पोस्टद्वारे सोशल मीडियात शेअर केली आहे. यात अभिनेता नागराज मंजुळेंसोबत दिसत आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्याने खास नागराज मंजुळेंचे आभार मानले आहे. त्याची पोस्ट सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

'मटका किंग' या वेब सिरीजची सध्या  विशेष चर्चा सुरू आहे. ही धमाकेदार वेब सिरीज आपल्याला प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल. या वेब सिरीजमध्ये आपल्याला काही मराठीही चेहरे पाहता येईल.  सिद्धार्थ जाधवचीही महत्त्वाची भूमिका आहे. आज 17 एप्रिल 2026 रोजी ही वेब सिरीज रिलीज  झाली आहे. वेब सिरीज रिलीज झाल्यानंतर सिद्धार्थने नागराज मंजुळेंसाठी खास पोस्ट शेअर करुन आभार व्यक्त केले आहे. 

सिद्धार्थ जाधवची नागराज मंजुळेंसाठी खास पोस्ट (Siddharth Jadhav Thanks Nagraj Manjule)

'नागराज मंजुळे भावा. तुझ्याबरोबर काम करण्याची इच्छा प्रत्येक कलाकाराची असते. आज मटका किंग या वेबसिरीजच्या निमित्ताने माझी ती इच्छा पूर्ण झाली आहे.  माझ्या आयुष्यातली पहिली वेब सिरीज ती ही तुझ्या दिग्दर्शनाखाली.. दगडू विचारे नावाचं पात्र तू मला साकारायला दिलेस माझ्यावर विश्वास टाकलास...ॲमेझॉन प्राईम सारखा प्लॅटफॉर्म, सिद्धार्थ रॉयय कपूर, अश्विनी मॅम ,यांच्यासारखे निर्माते आणि विजय वर्मा ,सई ताम्हणकर , कृतिका कामरा, गुलशन ग्रोवरसर, भरत जाधव सर, भूपेंद्र जडावत, गिरीश कुलकर्णी सर , किशोर कदम सर, आणि अशा मात्तबर कलाकारांबरोबर काम करायची संधी मिळाली.'

अभिनेत्याने नागराज मंजुळेंचे आभार केले व्यक्त (Siddharth Jadhav First Web Series Matka King)

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct)

'कलाकाराला प्रत्येक वेळेला चांगलं काम करायची संधी हवी असते आणि कुणीतरी तो विश्वास टाकावा अशी त्याची इच्छा असते. म्हणून तूच लिहलेला डायलॉग तुलाच सारखं सारखं ऐकवतो...शुक्रिया सेठ ....काम देने के लिए नही...भरोसा रखने के लिये...आपला सिद्धू...', असं म्हणत सिद्धार्थने  नागराज यांच्यासोबतचे  सेटवरील फोटो शेअर केले. जर आपल्याला सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आवडत असतील, तर ही सिरीज खास तुमच्यासाठी आहे. वीकेंडला आपण ही सिरीज नक्कीच एन्जॉय करु शकता. 

महत्त्वाच्या बातम्या

Sunita Ahuja on Govinda: 'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
Dengue vs Typhoid: तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
Vaibhav Mangle Daughter: 'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
Samay raina: समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द
समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Embed widget