एक्स्प्लोर

Siddharth Jadhav on Salman Khan: सलमान खाननं थेट स्टेजवर बोलवलं अन्...; सिद्धार्थ जाधव अन् बॉलिवूडचा भाईजान पहिल्यांदा भेटले कसे? किस्सा सांगताना सिद्धू म्हणाला...

सिद्धार्थ कॉलेजमध्ये असल्यापासून सलमान खानचा मोठा चाहता आहे. असं त्याने सांगितलं. दोघांची ओळख दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यामुळे झाल्याचेही तो म्हणाला

Siddharth Jadhav on Salman Khan: मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) सध्या त्याच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आहे. अफाट एनर्जी आणि विनोदी ढंगतील त्याच्या अभिनयाचं सगळीकडेच कौतुक होतं. बॉलीवूडच्या बड्या सुपरस्टार सोबतच जातो स्क्रीन शेअर करतोय. रणवीर सिंहच्या (Ranveer Singh) 'सिंबा' चित्रपटात त्याने साकारलेल्या भूमिकेला प्रेक्षकांची दाद मिळाली. शिवाय सलमान खानच्या (Salman Khan) राधे चित्रपटातही त्याने महत्त्वाची भूमिका साकारलेली. अलीकडेच 'बॉलीवूड बबल 'ला दिलेल्या मुलाखतीत सिद्धार्थने बॉलीवूडच्या भाईजानशी कशी ओळख झाली? सलमान आणि त्याच्या पहिल्या भेटीविषयी एक किस्सा सांगितला आहे. सिद्धार्थ कॉलेजमध्ये असल्यापासून सलमान खानचा मोठा चाहता आहे. असं त्याने सांगितलं. दोघांची ओळख दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यामुळे झाल्याचेही तो म्हणाला. ( Salman Khan First Meet)

सलमान सिद्धूची भेट कशी झाली ?

बॉलीवूडचा भाईजान म्हणून ओळखला जाणाऱ्या सलमान खानशी काही वर्षांपूर्वी मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव भेटला. या खास भेटीविषयी सिद्धार्थनं खुलासा केलाय. तो म्हणाला ' सलमान सर आणि महेश सर गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांचे चांगले मित्र आहेत. महेश सरांमुळे सलमान सरही मला ओळखू लागले. एकदा मी फिल्म सिटीमध्ये शूटिंग करत होतो.आणि तिथेच बाजूला सलमान सर बिग बॉसचा प्रोमो शूट करत होते. मी लगेच महेश सरांना म्हटलं 'मी त्यांना भेटायला जाऊ का ? ' त्यावर ते सहज 'जा' म्हणाले. त्यांच्यासाठी जाणं सोपं होतं कारण त्यांची मैत्री आहे पण माझ्यासाठी ते 'द सलमान खान ' होते. पण जेव्हा मी त्यांना प्रत्यक्ष भेटलो त्यावेळी ते माझ्याशी खूप छान बोलले.' असं सिद्धू म्हणाला.

 पहिल्या भेटीनंतर सलमान आणि सिद्धूची पुन्हा भेट झालेली. याविषयी सांगताना तो म्हणाला 'सलमान सर पुढे माझ्या 'येरे येरे पैसा ' या मराठी चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चला आले होते. तिथे त्यांनी मला थेट स्टेजवर बोलावलं. एवढ्या मोठ्या स्टारने आपल्याला स्टेजवर बोलावल्यामुळे मी थोडासा बावरलो होतो. पण माझ्या शेजारी बसलेल्या तेजश्री पंडितने मला सावरलं . ती म्हणाली 'अरे, जा ते तुलाच बोलवत आहेत ' आणि मग आमची हळूहळू छान ओळख झाली. नंतर राधे चित्रपटात सलमान खान यांच्यामुळेच एका भूमिकेसाठी सिद्धार्थला कॉल आला.

सलमान खानमुळे चित्रपटासाठी कॉल

सिद्धार्थ म्हणाला ' मी लंडनला असताना मला राधे चित्रपटातील एका भूमिकेसाठी विचारणा झाली. खरं सांगायचं तर मी विचारच केला नाही की माझी भूमिका किती मोठी आहे किंवा काय आहे. मी म्हटलं भूमिका गेली उडत! ज्या माणसाला बघत मी मोठा झालो तर सलमान सरांसोबत एका फ्रेममध्ये दिसणं, स्क्रीन शेअर करणं, ही माझ्यासाठी सर्वात मोठी गोष्ट होती. मी कुठल्याही अटी शर्ती न ठेवता लगेच चित्रपटासाठी होकार दिला होता.

हेही वाचा -

'बायकोला 10 व्या मिनिटांतच म्हणालो .. ' रणवीर-दीपिकाच्या रिसेप्शनमधून तातडीनं बाहेर पडला सिद्धार्थ जाधव; कारणही सांगितलं ..

 

महत्त्वाच्या बातम्या

Kushal Badrike On Atharv Sudame: अथर्व सुदामेकडून घरी बोलावून अपमान, कलाकारांना वाईट अनुभव; कुशल बद्रिकेचा संताप, VIDEO
अथर्व सुदामेकडून घरी बोलावून अपमान, कलाकारांना वाईट अनुभव; कुशल बद्रिकेचा संताप, VIDEO
BMC Action At Ajay Devgn Bungalow: अजय देवगणच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर हातोडा; BMC चे अधिकारी पोहोचले, भिंती, खिडक्या धडाधड तोडल्या, नेमकं प्रकरण काय?
अजय देवगणच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर हातोडा; BMC चे अधिकारी पोहोचले, भिंती, खिडक्या धडाधड तोडल्या, नेमकं प्रकरण काय?
Koffee With Karan 9 Salman Khan: 'माझं आयुष्य माझ्यासोबतच कबरीमध्ये दफन होईल...'; सलमान खानच्या वक्तव्यानं चाहते हादरले, नेमकं काय म्हणाला?
'माझं आयुष्य माझ्यासोबतच कबरीमध्ये दफन होईल...'; सलमान खानच्या वक्तव्यानं चाहते हादरले, नेमकं काय म्हणाला?
शेक्सपियरची 400 वर्षांहून जुनी कथा, मित्र मनात संशय पेरतो, पती मधुचंद्राच्या रात्रीच पत्नीचं आयुष्य संपवतो, बॉलिवूडचा 'हा' कल्ट क्लासिक सिनेमा पाहिलाय?
शेक्सपियरची 400 वर्षांहून जुनी कथा, मित्र मनात संशय पेरतो, पती मधुचंद्राच्या रात्रीच पत्नीचं आयुष्य संपवतो, बॉलिवूडचा 'हा' कल्ट क्लासिक सिनेमा पाहिलाय?

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivsena Eknath Shinde: एकनाथ शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांवर नाराज, शिवसेनेत लवकरच मोठे फेरबदलाची शक्यता; तरुण आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार
एकनाथ शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांवर नाराज, शिवसेनेत लवकरच मोठे फेरबदलाची शक्यता; तरुण आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार
Pune Crime News: पुण्यात अजित पवार गटाच्या दोन नगरसेवकांवर गुन्हा; मनपा अभ्यासिका-ग्रंथालयाची तोडफोड आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप
पुण्यात अजित पवार गटाच्या दोन नगरसेवकांवर गुन्हा; मनपा अभ्यासिका-ग्रंथालयाची तोडफोड आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप
Chhatrapati Sambhajinagar : दुष्काळाची दाहकता! जनावरांचा चारा चोरीला जाऊ नये म्हणून वैरणीला कुलूप, भीषण वास्तव समोर
दुष्काळाची दाहकता! जनावरांचा चारा चोरीला जाऊ नये म्हणून वैरणीला कुलूप, भीषण वास्तव समोर
पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
Pune Teacher Election : पुणे शिक्षकमध्ये पहिल्या फेरीत 25 हजारापेक्षा जास्त मतं घेऊन विजयी होणार, माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी थेट आकडेवारी मांडत विजयाचं गणित सांगितलं
पुणे शिक्षकमध्ये भाजप-सेनेचे स्वतंत्र उमदेवार रिंगणात,  माजी आमदार दत्तात्रय सावंत प्रचंड आशावादी, पहिल्या फेरीत विजयाचा दावा 
RBI : बँकिंग क्षेत्रात मोठ्या घडामोडी सुरु,दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
FDA Action : कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
Gokul Milk Union Election : आधी सहलीवर पाठवलं; आता सौंदत्तीच्या देवीची घ्यायला लावली शपथ, गोकुळच्या निवडणुकीत ठराव धारकांना देवीच्या प्रकोपाची भीती, व्हिडीओ समोर
आधी सहलीवर पाठवलं; आता सौंदत्तीच्या देवीची घ्यायला लावली शपथ, गोकुळच्या निवडणुकीत ठराव धारकांना देवीच्या प्रकोपाची भीती, व्हिडीओ समोर
Embed widget