एक्स्प्लोर

Shweta Tiwari MNS Raj Thackeray: आधी मनसेवर नको नको ते आरोप केले; आता श्वेता तिवारीनं राज ठाकरेंचे मानले आभार, नेमकं काय घडलं?

Shweta Tiwari on MNS: ट्रोलिंग अन् महिलांविरोधातील अपमानास्पद कमेंट्सप्रकरणी श्वेता तिवारीने नवं स्पष्टीकरण दिलंय.

Shweta Tiwari Trollers on MNS: अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) सोशल मीडियात प्रचंड सक्रीय असते. तिने अलिकडेच महिलांविरोधात अपमानजनक टिप्पणी आणि ट्रोल करणाऱ्यांचा उल्लेख करत सोशल मीडियात पोस्ट (Social Media) शेअर केली होती. तिने असेही म्हटले होते की, यातील काही ट्रोलर्स MNS पार्टीतील समर्थक आहेत, असा दावा तिने केला होता.   दरम्यान, या प्रकरणानंतर महाराष्ट्र नवनिर्माण  सेनेचे पदाधिकारी शालिनी ठाकरे यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर (MNS) पोस्ट शेअर केली. तसेच श्वेता तिवारीला सणसणीत उत्तर दिलं.  दरम्यान, या सर्व पार्श्वभूमीवर श्वेताने प्रतिक्रिया दिलेली आहे.  तसेच ट्रोलर्स हे मनसे (Maharashtra Navnirman Sena) पक्षाचे समर्थक किंवा मनसे पक्षातील नव्हते, असं अभिनेत्रीने स्पष्ट केलंय. यावेळी तिने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आभारही मानले. सध्या अभिनेत्रीच्या पोस्टची विशेष चर्चा होत आहे. तिची पोस्ट व्हायरल झाली आहे. 

श्वेता तिवारीने राज ठाकरेंचे मानले आभार (Shweta Tiwari clarifies trolls were not MNS members)

अभिनेत्रीने पोस्टमध्ये म्हटलं की,   'काही दिवसांपूर्वी मी पोस्ट शेअर केली होती.  ज्यात काही लोक विनाकरण महिलांवर अपमानास्पद टिप्पणी करत होते. तेव्हा मी त्यांच्या  इन्स्टाग्राम अकाऊंट्सचे स्क्रीनशॉटही शेअर केले होते.  कारण मला असं वाटतं की,  असे वर्तन करणाऱ्यांना  आपण यातून सहज सुटू शकतो, असं त्यांना वाटता कामा नये. मी राज ठाकरेंसमोर प्रश्न उपस्थित केला होता की, त्यांचा सपोर्ट करत असल्याचा दावा करणाऱ्या लोकांचा असा व्यवहार  स्वीकार्य आहे का?', असं श्वेता तिवारी म्हणाली होती.   'काही वेळानंतर मनसे पक्षातील नेत्या स्नेहल अडारकर यांनी माझ्याशी संपर्क साधला. तसेच महिलांप्रति असा व्यवहार स्वीकार्य नाही, असं सांगितलं'.

'त्यांनी यावेळी हे देखील स्पष्ट केलं की, या प्रकरणात सामील असलेले लोक पार्टीतील सदस्य नव्हते. गुन्हा कुणी केला आहे, याचा नक्कीच शोध घेण्याचा प्रयत्न केला जाईल.  यावेळी त्यांनी काही दिवसांसाठी माझ्याकडे मुदतही मागितली.  अवघ्या तीन दिवसांतच,  स्नेहल यांनी त्या व्यक्तींचा फोन नंबर आणि हाताने लिहिलेले माफीपत्र पाठवले', अशी माहिती श्वेता तिवारीने दिली. 'त्यांनी यावेळी माझ्यासमोर स्पष्ट केलं की, महिलांचा अपमान ते कधीही हलक्यात घेत नाहीत.  तसेच स्नेहल यांनी सांगितले की, भविष्यात मला कधीही अशा प्रकारच्या समस्या आल्या, तर, मी स्नेहल यांच्याशी संपर्क साधू शकते. त्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले, हे खरंच कौतुकास्पद आहेत'.

यासोबत श्वेता तिवारीने यावेळेस त्या व्यक्तींकडून पाठवण्यात आलेला माफीनामा देखील शेअर केला. श्वेताने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, 'खरंतर ही समस्या कोणत्याही एका व्यक्ती किंवा घटनेपेक्षाही मोठी आहे.  ती केवळ एका व्यक्तींपुरती मर्यादित राहत नाही.  मला खरंच आशा आहे की, जगातील  तंत्रज्ञान आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स नक्कीच यावर तोडगा काढतील.  कारण सध्या ऑनलाइन गैरवर्तन हे नियंत्रणाबाहेर जात आहे.  तरी देखील त्यांच्या प्रयत्नांचे मी विशेष कौतुक करते.  या प्रकरणाला गांभीर्याने घेतल्याबद्दल राज ठाकरे जी, थँक्यू...'

महत्त्वाच्या इतर बातम्या:

बॉलिवूडवर दु:खाचा डोंगर; प्रसिद्ध दिग्दर्शकाचे निधन, सलमान खान झाला भावूक, पोस्ट शेअर करुन फिल्ममेकरच्या पत्नीलाही दिला धीर

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kushal Badrike on Shourya Ambure: युथ ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या लेकीचा डंका, कुशल बद्रिकेनं केलं कौतुक; 'शौर्या' नावावरुन नेमकं काय म्हणाला?
युथ ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या लेकीचा डंका, कुशल बद्रिकेनं केलं कौतुक; 'शौर्या' नावावरुन नेमकं काय म्हणाला?
Deool Band Actress: 'माझं अन् आईचं वाईट कसं होईल...', 'देऊळ बंद' फेम अभिनेत्रीनं वडिलांचं नाव हटवलं; आईचं नाव जोडणार, कारण
'माझं अन् आईचं वाईट कसं होईल...', 'देऊळ बंद' फेम अभिनेत्रीनं वडिलांचं नाव हटवलं; आईचं नाव जोडणार, कारण
Zee Marathi Serials Twist: झी मराठीवरील मालिकांमध्ये जबरदस्त ट्विस्ट; एकीकडे समरची स्वानंदीला साथ, तर दुसरीकडे ज्योतीसमोर लग्नाचा पेच!
झी मराठीवरील मालिकांमध्ये जबरदस्त ट्विस्ट; एकीकडे समरची स्वानंदीला साथ, तर दुसरीकडे ज्योतीसमोर लग्नाचा पेच!
Mahabharat fame Actor: 'महाभारत' फेम अभिनेत्याला लुटलं, गुंतवणुकीच्या नावाखाली कोट्यवधींचा चुना, 4,44,48,000 रुपये लंपास, 5 आरोपी ताब्यात
'महाभारत' फेम अभिनेत्याला लुटलं, गुंतवणुकीच्या नावाखाली कोट्यवधींचा चुना, 4,44,48,000 रुपये लंपास, 5 आरोपी ताब्यात
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन
Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report
Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar ON VSR : अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
EPFO: मोठी बातमी, पीएफ खात्यातून 90 टक्के रक्कम काढता येणार, नव्या SWP ला मान्यता, ईपीएफओच्या CBT चा मोठा निर्णय
पीएफ खात्यातून 90 टक्के रक्कम काढता येणार, ईपीएफओच्या CBT चा खातेदारांसाठी मोठा निर्णय
Gold rhenium powder: सोन्याच्या दागिन्यांमध्ये भेसळ, वजन वाढवण्यासाठी वापरली जातेय ही चिनी गोल्ड पावडर, 22 कॅरेटचे सांगून खपवले जातायत 20 कॅरेटचे दागिने
सोन्याच्या दागिन्यांमध्ये भेसळ, वजन वाढवण्यासाठी वापरली जातेय ही चिनी गोल्ड पावडर, 22 कॅरेटचे सांगून खपवले जातायत 20 कॅरेटचे दागिने
मोठी बातमी ! महायुतीची सत्ता येताच इतिहासातील सर्वात मोठी दूध दरवाढ; गोकुळचं दूध 6 रुपयांनी महागलं
मोठी बातमी ! महायुतीची सत्ता येताच इतिहासातील सर्वात मोठी दूध दरवाढ; गोकुळचं दूध 6 रुपयांनी महागलं
EFPO On WhatsApp : फक्त Hi पाठवा, तुमच्या PF चे ए टू Z डिटेल्स मिळवा, बॅलन्स, पासबूक सर्व डिटेल्स व्हॉट्सॲपवर!
फक्त Hi पाठवा, तुमच्या PF चे ए टू Z डिटेल्स मिळवा, बॅलन्स, पासबूक सर्व डिटेल्स व्हॉट्सॲपवर!
गौतम हरी सिंघानिया यांना 10 व्या आयएसीसी बिझनेस लीडरशिप पुरस्कार सोहळ्यात 'उत्कृष्ट औद्योगिक नेतृत्व पुरस्कार' प्रदान
गौतम हरी सिंघानिया यांना 10 व्या आयएसीसी बिझनेस लीडरशिप पुरस्कार सोहळ्यात 'उत्कृष्ट औद्योगिक नेतृत्व पुरस्कार' प्रदान
सहकारात घराणेशाहीचाच गोतावळा; सहकारासाठी राबणारा सामान्य कार्यकर्ता कुठे? DCC बँक निवडणुकीतही 'वारसदार'च
सहकारात घराणेशाहीचाच गोतावळा; सहकारासाठी राबणारा सामान्य कार्यकर्ता कुठे? DCC बँक निवडणुकीतही 'वारसदार'च
वसुली एजंट थेट रुग्णालयात पोहोचला; ॲडमिट महिलेकडे कर्जाचा तगादा, सरकारचा धाक राहिलाय की नाही?
वसुली एजंट थेट रुग्णालयात पोहोचला; ॲडमिट महिलेकडे कर्जाचा तगादा, सरकारचा धाक राहिलाय की नाही?
Embed widget