Shriya Pilgaonkar : एकुलती एक या सिनेमातून सचिन (Sachin Pilgaonkar) आणि सुप्रिया पिळगांवकर (Supriya Pilgaonkar) यांच्या लेकीने म्हणजेच श्रियाने सिनेक्षेत्रात पाऊल ठेवलं. त्यानंतर तिने तिच्या अभियनाचा ठसा बॉलीवूडसह ओटीटीवरही सोडला. मिर्झापूर या सिरिजमधील श्रियाच्या भूमिकेला विशेष पसंती मिळाली. अभिनेते सचिन पिळगांवकर आणि अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर यांची लेक असूनही श्रिया (Shriya Pilgaonkar) तिच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिकंली. श्रिया कधीच कोणत्या चर्चेत आल्याचं विशेष पाहायला नाही मिळालं. पण तिच्याबाबतीतली एक चर्चा ही अजूनही कायम आहे. त्यावर नुकतच श्रियाने भाष्य केलं आहे. 


श्रिया ही सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया पिळगांवकर यांची दत्तक मुलगी असल्याच्या चर्चा अनेक काळांपासून आहेत. श्रियालाही बऱ्याचदा हा प्रश्न विचारला जातो. पण ती त्यावर फारसं बोलत नाही. पण यावेळी श्रियाने या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत चर्चांना पूर्णविराम दिला आहे. श्रियाने नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात. 


मी माझं जन्मप्रमाणपत्र इन्स्टाग्रामवर दाखवणार नाहीये - श्रिया पिळगांवकर


अभिनेत्री श्रिया पिळगांवकर हीने नुकतीच इंडिया टुडेला मुलाखत दिली. यावेळी तिने तिच्या दत्तक असण्याच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. तिने म्हटलं की, मी कुठेतरी एका बातमीत वाचलं होतं, की मला दत्तक घेण्यात आलं आहे. पण तसं काहीच नाहीये. मी माझ्या आई-वडिलांची दत्तक मुलगी नाहीये. मला दत्तक घेतलं अशी जी काही बातमी आली होती, ती पूर्णपणे खोटी आहे. मी काही स्पष्टीकरण द्यावं असा हा विषय खरंतर नाही. पण म्हणून मी माझी बाजू मांडण्यासाठी माझं जन्मप्रमाणपत्र इन्स्टाग्रामवर दाखवणार नाहीये. त्याची मला काही गरजंही वाटत नाही. पण लोकांच्या शंकेचं निरसन होणंही गरजेचं आहे. ही बातमी खरी नसली तरी ती हास्यास्पद आहे. मी वैयक्तिक रित्या कधीही कोणत्याही प्रकारच्या बातम्यांमध्ये राहण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे याच्याशिवाय माझ्याविषयी कोणत्याही खोट्या बातम्या लिहिल्या गेल्या नाहीयेत. 


श्रियाच्या कामाबद्दल


श्रियाने एकुलती एक या सिनेमातून पदार्पण केलं. त्यानंतर तिने शाहरुख खानसोबतही स्क्रिन शेअर केली. मिर्झापूर, ताजा खबर यांसारख्या सिरिजमधून श्रियाने ओटीटी माध्यांवर पाऊल ठेवलं. त्याचप्रमाणे ती आता लवकरच ‘ब्रोकन न्यूज 2’ या सिरिजमधून  राधा भार्गवच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


ही बातमी वाचा : 


Kiran Mane : 'तू मराठाकार्ड खेळ', मालिकेतून काढलं तेव्हा बड्या नेत्याने दिला होता सल्ला; किरण माने म्हणाले, मला जातीचं...