Babil Khan Post On Irrfan Khan :  दिवंगत अभिनेता इरफान खानचा ( Irrfan Khan) मुलगा बाबिल खान (Babil Khan) हा अभिनयाच्या क्षेत्रात आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून चालत आहे. बाबिलच्या कामाचे चांगले कौतुक झाले आहे. बाबिल हा सोशल मीडियावरही सक्रिय असतो. आपल्या पोस्टद्वारे तो आगामी प्रोजेक्टसची माहिती चाहत्यांना देतोच, शिवाय वडिलांच्या आठवणींना उजाळा देतो. मात्र, बाबिलच्या एका पोस्टमुळे चाहत्यांच्या चिंता वाढवल्या. बाबिलने या पोस्टमध्ये आपल्या दिवंगत वडिलांकडे जाण्याची इच्छा व्यक्त केल्याने चाहतेही हैराण झाले आहे. तर, वडिलांच्या आठवणीत बाबूल व्याकूळ झाला असल्याने ही पोस्ट त्याने लिहिली असावी असे म्हटले जात आहे.  



बाबिलने काय पोस्ट केली?


इरफान खानचा मुलगा बाबिलने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टवर लिहिले की,  कधी कधी वाटतं की आता मी माझा पराभव स्वीकार करावा, हार मानावी आणि बाबाकडे जावं. बाबिलची ही पोस्ट पाहून चाहते हैराण झाले. बाबिलसोबत नेमकं काय घडलंय, त्याच्यासोबत काय होतंय, असा प्रश्न चाहत्यांना पडला. या पोस्टमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.  बाबिल खानने आपल्या इन्स्टा स्टोरीवरून ही पोस्ट काही वेळेतच डिलीट केली.


बाबिलची क्रिप्टिक पोस्ट...




बाबिलने इरफान जुना फोटो केला होता शेअर... 


काही आठवड्यांआधी बाबिलने वडिल इरफान खान आणि आई सुतापा सिंकदरचा एक जुना फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. या ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटोमध्ये इरफान हा पत्नी सुतापाकडे पाहत आहे. तर, सुतापा कॅमेऱ्याकडे पाहत आहे.  बाबिलने कॅप्शनमध्ये म्हटले की,मला तुझी आठवण येईल, तुला माहीत आहे का? मी  माझ्या छत्रीखाली उभा आहे. मी तुला मिस करणार आहे, परंतु मला वाटते की पावसात नाचण्याची वेळ आली आहे.'' 


 






बाबिलच्या या पोस्टवर चाहत्यांनी चिंता व्यक्त केली होती. वडिलांच्या आठवणीने व्याकूळ झालेल्या बाबिलला चाहत्यांनी या पोस्टवर धीर दिला होता. 


चार वर्षांपूर्वी कर्करोगाने झाले होते इरफानचे निधन


बॉलिवूडसह हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या इरफान खानचे कर्करोगाच्या आजाराने  चार वर्षांपूर्वी, 29 एप्रिल 2020 मध्ये निधन झाले होते. इरफान खानने सहाय्यक अभिनेता ते मुख्य अभिनेता अशा भूमिका साकारताना विविध व्यक्तीरेखा साकारलेल्या. छोट्या पडद्यावरही इरफानने आपली छाप सोडली. इरफानच्या अकाली एक्झिटने सिनेरसिकांच्या मनाला चटका लागला होता.