एक्स्प्लोर

श्रेयस तळपदेच्या पुढाकाराने 'नाट्यदेवता' ओटीटी प्लॅटफॉर्मवर 

श्रेयस तळपदेने नाटकं रेकॉर्ड करून ती लोकांना दाखवण्याचा पर्याय ठेवला होता. त्याने ती संकल्पना सत्यात उतरवली आहे. ही संकल्पना आहे वेबसीरीज, सिनेमे यांप्रमाणे नाटकांनाही ओटीटी प्लॅटफॉर्म देण्याची.

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात सगळी मनोरंजनसृष्टी ठप्प झाली होती. कलाकार पेचात सापडला होता. नेहमीची देणी.. भाडी कशी भरायची यावरून प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. कलाकारांसाठी, मनोरंजनसृष्टीसाठी काहीतरी केलं पाहिजे हे प्रत्येकाला वाटत होतं. पण करायचं काय हे कळत नव्हतं. ही गोष्ट होती साधारण एप्रिल महिन्यातली. माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यानंतर तात्काळ पावलं उचललीच. पण दुसरीकडे त्यावेळी देवेंद्र फडणवीसही यासाठी प्रयत्नशील होते.

देवेंद्र फडणवीस यांनी एका झूम बैठकीचं आयोजन त्यावेळी केलं होतं. त्यात अनेक कलाकार, दिग्दर्शक, निर्माते सामील झाले होते. त्यात श्रेयस तळपदेही होता. यावेळी श्रेयसने नाटकासाठी एक पर्याय दिला होता. हा पर्याय होता नाटकं रेकॉर्ड करून ती लोकांना दाखवण्याचा. तो पुढे कसा नेमका आकाराला येईल हे सांगता येत नव्हतं. पण असं काहीतरी करायचंय हे श्रेयसच्या मनात तेव्हापासून होतं. त्यानंतर काही महिने गेले. लॉकडाऊन शिथील होऊ लागला. आता तर नाटकं होऊ लागली. पण श्रेयस आपल्या दिलेल्या संकल्पनेवर ठाम होता. आता त्याने ती संकल्पना सत्यात उतरवली आहे. ही संकल्पना आहे वेबसीरीज, सिनेमे यांप्रमाणे नाटकांनाही ओटीटी प्लॅटफॉर्म देण्याची.

श्रेयस तळपदे या उमद्या कलाकाराने पुढाकार घेऊन ही संकल्पना आकाराला आणली आहे. श्रेयस याबद्दल एबीपी माझाशी बोलताना म्हणाला, 'फडणवीस साहेबांसोबत झालेल्या त्या बैठकीनंतर माझ्या मनात हा प्रोजेक्ट आकार घेऊ लागला. आता तो तयार आहे. या ओटीटी प्लॅटफॉर्मचं नाव आहे नाईनरासा. यात सर्व प्रकारची नाटकं, एकांकिका, दीर्घांक लोकांना पाहता येतील. गेले अनेक महिने यावर काम चालू आहे. अनेक जुनी नाटकं आम्ही खास शूट केली आहेत. अशी नाटकं शूट करून सध्या आमच्याकडे जवळपास 100 तासांचा कंटेंट रेडी आहे. यात नाटकं, एकांकिका, दीर्घांक असं रंगमंचावर सादर होणारं सगळं काही आहे. लोकांना नाटकं पाहता यावीत हा यामागचा हेतू आहे. विशेष बाब अशी की बरेच नामांकित कलाकारांनी यात आपला सहभाग नोंदवला आहे. या कामी आमची वेगळी टीम आहे. मला अनेक कलाकाराांनी आवर्जून मदत केली. सुशांत शेलार, अतुल परचुरे, आनंद इंगळे अशी बरीच नावं यात आहेत. हा ओटीटी प्लॅटफॉर्म अद्याप आला नाहीय. पण नव्या वर्षात तो नक्की लोकांच्या सेवेत रुजू होईल. '

श्रेयसने आपल्या भावाच्या मदतीने हा डोलारा उभा केला आहे. नाटकासाठी खास नेपथ्य तयार करून सहा कॅमेरा सेटअप करून ही नाटकं शूट झाली आहेत. याबद्दल बोलताना श्रेयस म्हणाला, 'नाट्यव्यवसाय चालावा याच हेतून मी हे करतोय. या निमित्ताने आम्ही जी नाटकं शूट केली ती नाटकं खरंतर तयार आहेत. एक चक्री मारली की ही नाटकं थिएटरमध्ये सादर करता येतील. त्यालाही आमची ना नाही. कारण, यातून नाटक पुढं गेलं पाहिजे. आम्ही नाटक शूट केलं आता त्यावर आमचाच अधिकार असं आम्ही काहीही केलेलं नाही. उलट आम्हाला वाटतं की या निमित्ताने नाटकं सादर व्हावीत. सामान्य लोकांना परवडेल अशा फीमध्ये हा ओटीटी प्लॅटफॉर्म पाहता येईल. म्हणजे एका नाटकाचं शेवटचं तिकीट ज्या किमतीचं असतं त्याहीपेक्षा कमी किमतीत त्यांनाा महिन्याभराचं सबस्क्रिप्शन मिळेल. ज्यात ही कितीही नाटकं कितीही वेळा पाहता येणार आहेत.'

श्रेयस तळपदे या कलाकाराला नाटकाची पार्श्वभूमी आहे हे आपण सगळेच जाणतो. ऑल द बेस्टसारख्या नाटकाचे श्रेयसने शेकड्याने प्रयोग केले. त्यानंतर मराठी चित्रपट करता करता श्रेयस हिंदीत गेला. आता तो तिकडे पुरता उत्तम स्थिरावला आहे. पण असं असलं तरी त्याने आपली मराठीची नाळ सोडलेली नाही. सिनेमे करता करता नाटकासाठीही काही करायची त्याची उर्मी त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. आता तो नाटकासाठीचा नवा पर्याय घेऊन येतो आहे. त्याला नाट्यधर्मी कसा प्रतिसाद देतायत ते कळेल लवकरच.

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan in Alliance: 'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
Jhimma 3 Poster: 'यावेळी तिसराच आहे!'... 'झिम्मा 3'च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता, यावेळी नेमकं कोण कोण असणार?
'यावेळी तिसराच आहे!'... 'झिम्मा 3'च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता, यावेळी नेमकं कोण कोण असणार?
Prapti Redkar on harassment: 'डोक्यात फोन टाकला अन् प्रायव्हेट पार्टवर मारलं'; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने छेड काढणाऱ्याला घडवली अद्दल, रेल्वे स्थानकावर काय घडलं?
'डोक्यात फोन टाकला अन् प्रायव्हेट पार्टवर मारलं'; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने छेड काढणाऱ्याला घडवली अद्दल, रेल्वे स्थानकावर काय घडलं?
Maitreya Marathi Film: मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट! ‘मैत्रेया’चा पोस्टर आऊट; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट! ‘मैत्रेया’चा पोस्टर आऊट; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget