एक्स्प्लोर

Shraddha Kapoor: पजामा - टी शर्ट अन् केसांचा बन, घरात बेभान होऊन नाचली श्रद्धा कपूर; नेटकरी म्हणाले, आधी घर साफ कर..

Shraddha Kapoors Viral Reel: श्रद्धा कपूरचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल.

Shraddha Kapoor Viral Dance: बॉलिवूडची क्यूट अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) प्रोफेशनलसह वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. सिनेमांपेक्षा अभिनेत्री (Entertainment) सोशल मीडियात सक्रीय असते. रिल्स आणि पोस्टच्या माध्यमातून अभिनेत्री (Actress) नेटकऱ्यांचं मनोरंजन करते. बुधवारी अभिनेत्रीनं एक व्हिडीओ (Viral Video) इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या व्हिडीओत आपण पाहू शकतो की, अभिनेत्री मनसोक्त डान्स करताना दिसत आहे. श्रद्धा पॉप स्टार मायकल जॅक्सनच्या गाण्यावर थिरकत होती.  तिच्या डान्सचा व्हिडीओ बॉयफ्रेंड राहुल मोदीने रेकॉर्ड केला. श्रद्धाचा हा व्हिडीओ सोशल मीडियात जबरदस्त व्हायरल झाला असून,  नेटकऱ्यांनी यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

श्रद्धा कपूरचा डान्स व्हिडीओ व्हायरल (Shraddha Kapoors Fun Dance Video)

मायकल जॅक्सनच्या गाण्यावर अभिनेत्री श्रद्धा कपूर निर्धास्तपणे नृत्यकौशल्य सादर करत होती.  कॅज्यूअल कपड्यांमध्ये अभिनेत्री मनसोक्त डान्स करत होती. अभिनेत्रीचा डान्स जबरदस्त होता.  श्रद्धा कपूरने आपल्या डान्सचा व्हिडीओ शेअर केला आहे. तिनं व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटलं की, 'अशी व्यक्ती शोधा जी तुम्हाला असे नाचायला लावेल'. व्हिडीओच्या शेवटी अभिनेत्री कॅमेऱ्याकडे पाहून हसते. श्रद्धाचा हा डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  

श्रद्धाच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी क्वीन, श्रद्धा पगलू, अशा प्रकारचे कमेंट्स केल्या आहेत. परंतु, असे देखील काही नेटकरी होते, ज्यांनी श्रद्धाचा डान्स नसून, घरातील विखुरलेल्या वस्तूंकडेही लक्ष दिले. एकाने तर अभिनेत्रीला नाचण्यापूर्वी घरातील पसारा आवरण्याचा सल्ला दिला.   एका युझरने, 'घर खूप अस्वच्छ आहे. निदान व्हिडीओ ग्रीन स्क्रीनवर करायला हवा होता', अशी कमेंट केली आहे. या कमेंटवर अभिनेत्रीने आपल्या मिश्किल पद्धतीने प्रतिक्रिया दिली आहे. 'डिअर मॉम, रिअल आयडीतून कमेंट करा', श्रद्धाने दिलेली प्रतिक्रिया लोकांची मने जिंकत आहे.

राहुल मोदीने श्रद्धा कपूरचा व्हिडीओ केला शूट (Shraddha Kapoor and Rahul Mody relationship)

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shraddha ✶ (@shraddhakapoor)

व्हिडीओच्या सुरुवातीला राहुल मोदीचा आवाज ऐकू येतो.  श्रद्धा डान्स करत असताना तिचा बॉयफ्रेंडही तिथेच होता. श्रद्धा आणि राहुल बऱ्याच वर्षांपासून एकत्र आहेत. दोघेही एकत्र अनेकदा स्पॉट झाले आहेत. दरम्यान, दोघांनी अद्याप अधिकृतपणे या नात्याला दुजोरा दिलेला नाही.   बऱ्याचदा दोघेही एकत्र इव्हेंटमध्ये दिसतात. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या  लग्नाचीही अफवा पसरली होती. मात्र, त्यानंतर दोघांकडून कोणतंही स्टेटमेंट आलेलं नाही.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'दम असेल तर सलमान खानला बॅन करा...'; रणवीर सिंहच्या FWICE प्रकरणात राखी सावंतची उडी, VIDEO

ABP माझाच्या बातम्या LIVE..

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Actor On PM Modi Video: 'संसदेतून शेपूट घालून पळायचं अन् इन्स्टावर..' PM मोदींच्या व्हीडिओवरून मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत; म्हणाला,' स्क्रिप्टेड पोकळ ज्ञान ..'
'संसदेतून शेपूट घालून पळायचं अन् इन्स्टावर..' PM मोदींच्या व्हीडिओवरून मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत; म्हणाला,' स्क्रिप्टेड पोकळ ज्ञान ..'
Kirti Kulhari Cyber Fraud : थिएटरमध्ये अलर्ट आला अन् काही मिनिटांत खात्यातून लाखो लंपास;लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीची मोठी सायबर फसवणूक
थिएटरमध्ये अलर्ट आला अन् काही मिनिटांत खात्यातून लाखो लंपास;लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीची मोठी सायबर फसवणूक;
Kangana Ranaut Hits Back at Trolls: कंगना रनौतचा ट्रोलर्सना पुन्हा पलटवार; सिनेमातील क्लिप्स व्हायरल करणाऱ्यांना सुनावले खडेबोल, म्हणाली...
कंगना रनौतचा ट्रोलर्सना पुन्हा पलटवार; सिनेमातील क्लिप्स व्हायरल करणाऱ्यांना सुनावले खडेबोल, म्हणाली...
Vishal Dadlani On PM Modi Video: 'हा अहंकार सोडा, PR कमी करा, फालतू रील्स बनवणं बंद करा..' पीएम मोदींच्या व्हिडिओवर विशाल ददलानीची टीका; म्हणाला...
'हा अहंकार सोडा, PR कमी करा, फालतू रील्स बनवणं बंद करा..' पीएम मोदींच्या व्हिडिओवर विशाल ददलानीची टीका; म्हणाला...
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Crime News: लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
jantar mantar viral girl : इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
Embed widget