एक्स्प्लोर

मी लग्न करणार.. श्रद्धा कपूरनं लग्नावरून दिली चाहत्यांना दिली मोठी अपडेट, 'या' लेखकाला करतेय डेट? चाहत्यांमध्ये चर्चा रंगली

सध्या तरी श्रद्धाने दिलेल्या एका ओळीमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आता श्रद्धा कपूर खरंच कधी आणि कोणासोबत लग्न करणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Shraddha Kapoor: बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. चित्रपटांसोबतच श्रद्धाची लव्ह लाइफ कायमच चाहत्यांसाठी उत्सुकतेचा विषय ठरते. श्रद्धा कपूरची सोशल मीडियावर तिची फॅन फॉलोइंग ग्लोबल आयकॉन प्रियंका चोप्रापेक्षाही जास्त आहे. एकीकडे चाहते श्रद्धाच्या साधेपणावर फिदा होतात, तर दुसरीकडे तिच्या मनावर सध्या फक्त राहुल मोदीचं राज्य असल्याचं बोललं जातंय. गेल्या काही काळापासून श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी यांच्यातील नात्याच्या चर्चा जोरात आहेत. दोघांनीही कधीच अधिकृतपणे आपल्या नात्याबद्दल कबुली दिलेली नसली, तरी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडिओंमुळे चाहत्यांमध्ये चर्चा रंगलीय. अशातच श्रद्धाने स्वतः तिच्या लग्नावर प्रतिक्रिया दिल्याने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

गेल्या बर्‍याच काळापासून बॉलिवूडच्या वर्तुळात श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी यांच्या अफेअरच्या चर्चा रंगत आहेत. आता पुन्हा एकदा श्रद्धा कपूर तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आली आहे, पण यावेळी विषय थेट तिच्या लग्नापर्यंत जाऊन पोहोचला आहे. लवकरच लग्नगाठ बांधण्याची तयारी आहे का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

मी करेन, विवाह करेन..

कियारा अडवाणीपासून ते कतरिना कैफ आणि दीपिका पादुकोणपर्यंत अनेक अभिनेत्री लग्न झालंय. अनेकींनी गुडन्यूजही दिलीय. आता फक्त चाहत्यांना प्रतीक्षा आहे, ती त्यांच्या लाडक्या श्रद्धा कपूरच्या घरी शहनाई कधी वाजणार याची. मंगळवारी श्रद्धा कपूर तिचा ज्वेलरी ब्रँड इंस्टाग्रामवर प्रमोट करत होती. या व्हिडीओमध्ये ती म्हणाली, “खरं सांगायचं तर व्हॅलेंटाईन डेच्या आसपासच सगळ्यात जास्त ब्रेकअप्स होतात. 3-4 वेळा ‘धुरंधर’ पाहिला, न्यू ईयरला पार्टी केली आणि जिम मेंबरशिपही घेतली. बजेट संपलं… सिग्नलवरून विकत घेतलेला गुलाब दिला, तर ब्रेकअप कसं नाही होणार? हा प्रॉब्लेम मला समजतो, म्हणूनच तुमच्यासाठी व्हॅलेंटाईन डेचे स्पेशल गिफ्ट्स बनवले आहेत, जेणेकरून तुम्हाला एफडी तोडावी लागणार नाही.”

याच दरम्यान कमेंट सेक्शनमध्ये एका चाहत्याने श्रद्धाला थेट विचारलं की ती लग्न कधी करणार आहे? चाहत्यांच्या कमेंट्सना मोकळेपणाने उत्तर देणारी श्रद्धा कपूर या प्रश्नापासून पळाली नाही. उलट तिने मजेशीर अंदाजात उत्तर देत लिहिलं, “मी करेन, विवाह करेन.”


मी लग्न करणार.. श्रद्धा कपूरनं लग्नावरून दिली चाहत्यांना दिली मोठी अपडेट, 'या' लेखकाला करतेय डेट? चाहत्यांमध्ये चर्चा रंगली

श्रद्धा कपूर राहुल मोदीला डेट करत आहे का?

 श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी यांच्या डेटिंगच्या अफवा तेव्हा अधिक जोरात पसरल्या, जेव्हा 2024 मध्ये दोघांना मुंबईत एकत्र डिनर डेटवर स्पॉट करण्यात आलं होतं. मात्र, श्रद्धा कपूरने अजूनही राहुल मोदीसोबतच्या नात्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. राहुल मोदी पेशाने लेखक असून त्यांनी ‘प्यार का पंचनामा 2’ आणि ‘सोनू के टीटू की स्वीटी’ यांसारख्या चित्रपटांचं लेखन केलं आहे.राहुल मोदीच्या आडनावामुळे “श्रद्धा मोदी कुटुंबाची सून होणार का?” असा प्रश्नही सतत विचारला जात आहे. मात्र, या सर्व चर्चांवर श्रद्धा किंवा राहुलकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. सध्या तरी श्रद्धाने दिलेल्या एका ओळीमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आता श्रद्धा कपूर खरंच कधी आणि कोणासोबत लग्न करणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
Marathi Suspense Thriller: 1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
Isha Koppikar On PM Modi: 'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
Viraj Japtap on Maharashtrachi HasyaJatra: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget