Shilpa Shetty New Post : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. आता पती राज कुंद्राच्या पॉर्न प्रकरणात अटक झाल्यानंतर शिल्पाने एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना गोंधळाच टाकले आहे. त्यामुळे शिल्पा पुढे काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.
शिल्पा शेट्टीने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लेखक 'कार्ल बर्ग' च्या पुस्तकातील 'न्यू एंडिंग्स' (New Endings) शेअर केले आहे. ज्यामध्ये लिहिले आहे की, कोणीही मागे जाऊ शकत नाही परंतु नवीन सुरुवात करु शकतो. आपण आपल्या चुकीच्या निर्णयांबद्दल विचार करण्यात जास्त वेळ घालवतो. ज्या चूका आपण केल्या आहेत. ज्या मित्रांना आपण दुखावले, जर मी थोडी स्मार्ट असते, असा विचार केला तरी आपण आपला भूतकाळ बदलू शकत नाही.
पुढे शिल्पा म्हणाली, परंतु आपण एक नवीन सुरूवात करत पुढे जाई शकतो. चांगले निर्णय, जुन्या चूकांची पुनारावृत्तीन करता जे आपल्याजवळ आहे त्यासोबत आपण स्वत:ला बदलण्याच्या अनेक संधी देऊ शकतो. सगळ्यात शेवटी लिहिले की, जे भूतकाळात झाले आहे जर आता पासून कोणी त्या गोष्टींकडे लक्ष दिलं तर शेवट वेगळा होऊ शकतो.’
दरम्यान काही दिवसांपूर्वी शिल्पा जम्मू येथे माता वैष्णो देवीच्या दर्शनासाठी गेली होती. या चे फोटो सोशल मीडियावर चांगले व्हायरल झाले होते. द इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार शिल्पाने मुंबई पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, राज कुंद्राच्या कामाबद्दल शिल्पाला जास्त माहिती नव्हती. कारण ती स्वत:च्या कामात जास्त व्यस्त होती