एक्स्प्लोर

Shilpa Shetty On Reservation Viral Post: 'लोकच आरक्षण संपवण्याची मागणी करतील...', शिल्पा शेट्टीच्या नावाने पोस्ट व्हायरल; अभिनेत्रीची संतप्त प्रतिक्रिया ..

तिने चाहत्यांना आणि सोशल मीडिया वापरणाऱ्यांना तिच्या नावाने व्हायरल होणाऱ्या अशा दिशाभूल करणाऱ्या पोस्टवर विश्वास न ठेवण्याचं आवाहनही केलं.

Shilpa Shetty Viral Post Reaction: बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) सध्या जोरदार चर्चेत आहे. सीजेपी आंदोलनानंतर अनेकजण आता 'आरक्षण' या विषयावर बोलू लागले आहेत. यातच शिल्पा शेट्टीची एक कथित पोस्ट सोशल मीडियावर फिरत होती. या पोस्टमध्ये जातीय आरक्षण रद्द करण्याच्या बाजूचं वक्तव्य केल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, यावर अभिनेत्री शिल्पा शेट्टीने प्रतिक्रिया दिली असून आरक्षणासंदर्भात तिने कुठलीही पोस्ट केली नसल्याचं सांगत, व्हायरल होत असणारे सगळे दावे निराधार खोटे आणि बनावट असल्याचं स्पष्ट केलं. तिने चाहत्यांना आणि सोशल मीडिया वापरणाऱ्यांना तिच्या नावाने व्हायरल होणाऱ्या अशा दिशाभूल करणाऱ्या पोस्टवर विश्वास न ठेवण्याचं आवाहनही केलं.

काय होतं या व्हायरल पोस्टमध्ये?

यात 'आरक्षणाला हात लावू नका.सर्वसाधारण प्रवर्गातील डॉक्टरांनी फक्त त्याच प्रवर्गातील रुग्णांवर उपचार करावेत आणि इतर सर्व डॉक्टरांनी त्यांच्या त्यांच्या जातीतील रुग्णांवर उपचार करावेत.काही वर्ष अशी व्यवस्था लागू करून पहा, मग लोक स्वतःच जातीय आरक्षण संपवण्याची मागणी करतील.आरक्षणामुळे कौशल्य मिळत नाही.'  असा मजकूर या व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये होता. ही पोस्ट शिल्पा शेट्टीने केल्याचं दाखवण्यात आलं होतं.

 

बनावट पोस्टवर शिल्पा शेट्टीची संतप्त प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या जातीय आरक्षणाबाबतच्या कथित पोस्टने खळबळ उडाल्यानंतर, अभिनेत्री शिल्पा शेट्टीने या सगळ्या प्रकारावर प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली ' माझ्या नावाने आरक्षणाबाबत खोटी विधान जोडली जात असल्याचे पाहून मला धक्का बसलाय. हा पूर्णपणे बनावट आणि द्वेषातून पसरवलेला खोटा प्रचार आहे. कृपया अशा फेक पोस्ट किंवा अफवांवर विश्वास ठेवू नका.' असं तिने एक्स माध्यमावर स्पष्ट केलं.

 

अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या कामाबाबत बोलायचं झाल्यास, ती नुकतीच कन्नड चित्रपटात झळकली होती. या चित्रपटाचं नाव 'केडी : द डेव्हिल' असं होतं. या चित्रपटात ध्रुवसर्जा प्रमुख भूमिकेत होता.30 एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित झालाय. याशिवाय शिल्पाने ' माँ है ना ' या कुकिंग शो चे सूत्रसंचालनही केलं होतं. या कार्यक्रमाचा समारोप नुकताच 1 जुलै रोजी झाला. चित्रपट आणि टीव्ही सोबतच शिल्पा सोशल मीडियावर हे सक्रिय असते. ती नियमितपणे फिटनेस तिच्या वैयक्तिक आयुष्यातील आणि व्यावसायिक घडामोडींच्या अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असते.

महत्त्वाच्या बातम्या

Mahesh Babus Nephew Marriage: महेश बाबूच्या घरी कोरियाची सूनबाई; व्हिएतनाममध्ये शाही लग्नसोहळा पार पडला, जोडप्याचे सुंदर PHOTOS व्हायरल
महेश बाबूच्या घरी कोरियाची सूनबाई; व्हिएतनाममध्ये शाही लग्नसोहळा पार पडला, जोडप्याचे सुंदर PHOTOS व्हायरल
Yetech Aata Mi Naandayla: '50 ATKT अन् गावभर लागले नापासाचे होर्डिंग्ज' अभिनेता हर्षद अतकारीने सांगितला मजेशीर किस्सा
'50 ATKT अन् गावभर लागले नापासाचे होर्डिंग्ज' अभिनेता हर्षद अतकारीने सांगितला मजेशीर किस्सा
Kedar Shinde on Kombdi Palali: 'कोंबडी पळाली' गाणं शूटसाठी माझ्याकडे नव्हते पैसे, भरत मदतीला धावला, तुफान नाचला; केदार शिंदेंनी सांगितला भन्नाट किस्सा
'कोंबडी पळाली' गाणं शूटसाठी माझ्याकडे नव्हते पैसे, भरत मदतीला धावला, तुफान नाचला; केदार शिंदेंनी सांगितला भन्नाट किस्सा
Bigg Boss 20 Actress: 'बिग बॉस 20'फेम अभिनेत्रीचा शॉकिंग खुलासा, चुलत भावानेच 'नको तिथे स्पर्श केला'; प्रेग्नेंसीच्या भीतीने खाल्ली पपई
'बिग बॉस 20'फेम अभिनेत्रीचा शॉकिंग खुलासा, चुलत भावानेच 'नको तिथे स्पर्श केला'; प्रेग्नेंसीच्या भीतीने खाल्ली पपई

व्हिडीओ

Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..
Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक
Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report
Devendra Fadnavis Koyna Dam Water : मुंबईसाठी कोयनेचं पाणी,पाठिंबा आणि गाऱ्हाणी Special Report
Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar : मोठी बातमी : देवेंद्र फडणवीसांना पुण्याचे पालकमंत्री केलं तर आणखी वाटोळं होईल, रोहित पवारांचा घणाघात
मोठी बातमी : देवेंद्र फडणवीसांना पुण्याचे पालकमंत्री केलं तर आणखी वाटोळं होईल, रोहित पवारांचा घणाघात
CP On Mandar Kiwale Case: मंदार किवळेला संपवण्यासाठी मास्टर प्लॅन, शस्त्र कुठून घेतली, कट कसा रचला, पोलिस आयुक्त अमितेश कुमारांनी दिली A टू Z माहिती
मंदार किवळेला संपवण्यासाठी मास्टर प्लॅन, शस्त्र कुठून घेतली, कट कसा रचला, पोलिस आयुक्त अमितेश कुमारांनी दिली A टू Z माहिती
Sharad Pawar Health: शरद पवार ब्रीच कैंडी रुग्णालयात दाखल, प्रफुल पटेल पुन्हा भेटीला; रोहित पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया
शरद पवार ब्रीच कैंडी रुग्णालयात दाखल, प्रफुल पटेल पुन्हा भेटीला; रोहित पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया
पुण्यातील गोळीबार, मारहाणप्रकरणी सुनावणी; आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी, कोर्टात दोन्ही वकिलांचा युक्तिवाद
पुण्यातील गोळीबार, मारहाणप्रकरणी सुनावणी; आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी, कोर्टात दोन्ही वकिलांचा युक्तिवाद
मुख्यमंत्री होऊन पुढच्या वर्षी आषाढीला पंढरपुरात पूजा करावी; ज्योती वाघमारेंकडून पुन्हा एकनाथ शिंदेंच्या CM पदाचं वक्तव्य
मुख्यमंत्री होऊन पुढच्या वर्षी आषाढीला पंढरपुरात पूजा करावी; ज्योती वाघमारेंकडून पुन्हा एकनाथ शिंदेंच्या CM पदाचं वक्तव्य
Mumbai Mahim Firing Case: माहीम गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट; बिश्नोई गँगकडून धमकी देत 10 कोटींच्या खंडणीची मागणी; ज्वेलर्सचा खळबळजनक दावा
माहीम गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट; बिश्नोई गँगकडून धमकी देत 10 कोटींच्या खंडणीची मागणी; ज्वेलर्सचा खळबळजनक दावा
Rajgurunagar Accident CCTV: राजगुरुनगरजवळील राक्षेवाडीत एसटीला ओव्हरटेक करताना गाडी घसरली, चाकाखाली चिरडली गेली अन्..., एमपीएससी विद्यार्थिनीचा मृत्यू; अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद
राजगुरुनगरजवळील राक्षेवाडीत एसटीला ओव्हरटेक करताना गाडी घसरली, चाकाखाली चिरडली गेली अन्..., एमपीएससी विद्यार्थिनीचा मृत्यू; अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारची नवी योजना; 1 लाख रिक्षा वाटप करणार, प्रताप सरनाईकांनी दिली माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारची नवी योजना; 1 लाख रिक्षा वाटप करणार, प्रताप सरनाईकांनी दिली माहिती
Embed widget