Shibani Dandekar : बॉलीवूड अभिनेता फरहान अख्तरने (Farhan Akhtar) लाँगटाईम मैत्रीण शिबानी दांडेकरसोबत (Shibani Dandekar) 19 फेब्रुवारी रोजी लग्नगाठ बांधली. हे कपल 2018 पासून एकमेकांना डेट करत होते. आता लग्नानंतर काही दिवसांनी शिबानी दांडेकरने सोशल मीडियावर तिचं नाव बदललं आहे. शिवानीने नेमकं काय नाव ठेवलं असावं याबाबत चाहते प्रचंड उत्सुक आहेत. तर, शिवानी आता मिसेस अख्तर झाली आहे. तिच्या इंस्टाग्राम बायोनुसार (Instagram Bio), शिबानी दांडेकर-अख्तर (Shibani Dandekar- Akhtar) असं नाव शिबानीने ठेवलं आहे. 




 शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तर यांचा 19 फेब्रुवारी रोजी खंडाळ्यात विवाह (Shibani Dandekar And Farhan Akhtar Wedding) झाला. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांनी लग्नाआधी कधीही प्रेम लपवून ठेवले नाही. दोघांनीही सोशल मीडियावर आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तर यांची भेट एका रिअॅलिटी शो दरम्यान झाल्याची माहिती आहे. 2015 मध्ये, फरहान अख्तर आय कॅन डू इट रिअॅलिटी शो होस्ट करत होता, तर शिबानी दांडेकर त्या शोमध्ये एक स्पर्धक होती. शो दरम्यानच त्यांच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. 


शिबानी आणि फरहाननेही आपले नाते फार काळ लपवले नाही आणि आपले प्रेम जगासमोर व्यक्त केले. शिबानी आणि फरहान दोघेही पहिल्यांदाच दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या रिसेप्शन पार्टीत कपल म्हणून दिसले होते. एवढेच नाही तर, 2020 मध्ये जेव्हा शिबानी दांडेकरने फरहान अख्तरचे नाव गळ्यावर गोंदवले तेव्हा त्यांच्या प्रेमाची बरीच चर्चा झाली होती.


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha