Farhan-Shibani Post Marriage : बॉलीवूड अभिनेता फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) 19 फेब्रुवारी रोजी लग्नबंधनात अडकले आहेत. लग्नानंतर पहिल्यांदाच फरहान आणि शिबानी पापाराझींना मिठाई वाटप करताना स्पॉट झाले आहेत. 


मिठाई वाटप करताना फरहान आणि शिबानी दोघेही आनंदी दिसत आहेत. दरम्यान दोघांनी फोटोसाठी चांगल्या पोझदेखील दिल्या आहेत. मिठाई वाटप करण्यासाठी दोघांनी सारख्या रंगाचा पेहराव परिधान केला होता. तसेच शिबानीने हिऱ्यांचे दागिने घातले आहेत.





फरहान आणि शिबानीने एका खास पद्धतीत लग्न केले आहे. त्यांनी एकमेकांबद्दलच्या इच्छा आणि अपेक्षा लिहून काढल्या आहेत. या इच्छा त्यांनी लग्नसोहळ्यात वाचल्या आहेत. दोघांचं प्रेम धार्मिक परंपरेपेक्षा वरचढ आहे. यासाठी दोघांनी एकमेकांना पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. त्यांचे लग्न अतिशय साधेपणाने झाले आहे.


संबंधित बातम्या


Upcoming Movies on OTT: 'बच्चन पांडे' ते 'गंगूबाई काठियावाडी' पर्यंत 'हे' सिनेमे होणार ओटीटीवर प्रदर्शित


Wedding Bells : यंदा लग्नाच्या बेडीत अडकणार रश्मिका अन् 'हा' अभिनेता, अफेअरच्या चर्चांना उधाण!


The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स' सिनेमाचा ट्रेलर आऊट, 11 मार्चला सिनेमा होणार प्रदर्शित


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha