Sher Shivraj : 'पावनखिंड' या चित्रपटाला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांची टिम 'शेर शिवराज' (Sher Shivraj) हा नवा चित्रपट घेऊन सज्ज झाली आहे. शिवकालीन इतिहासातील सुवर्णपान ठरावा असा अफजलखान वधाचा अध्याय 22 एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात पहायला मिळणार आहे.


अतिशय क्रूर, दगाबाज आणि शक्तिशाली अफजलखान म्हणजे स्वराज्यावरचं सगळ्यात मोठं संकट. विजापूरच्या सल्तनतेचा दक्षिणेकडे विस्तार करण्यात अफजलखानाची मोठी भूमिका होती. 'मै लाऊंगा शिवाजी को...! जिंदा या मुर्दा!', अशी वल्गना करत अफजलखान स्वराज्यावर चालून आला. युद्धरणनीतीमध्ये निष्णात आणि वेळप्रसंगी कट-कारस्थानं, दगाफटका करुन शत्रूला पराभूत करण्यात माहिर असलेला अफजलखान प्रतापगडाच्या पायथ्याशी पोहोचला खरा पण शिवरायांच्या बुद्धिचातुर्यापुढे त्याचा निभाव लागू शकला नाही.


छत्रपती शिवाजी महाराजांचा हा सगळा पराक्रमी अध्याय 22 एप्रिलला आपल्यासमोर येणार आहेच. पण, त्या अगोदर अफजलखानाची भूमिका कोण करणार? याची मोठी उत्सुकता सगळयांना लागून राहिली आहे. तोच अफजलखान, आज (11 एप्रिल) ट्रेलर अनावरण सोहळयानंतर प्रेक्षकांसमोर प्रत्यक्ष अवतरणार आहे.



मराठ्यांच्या इतिहासातील सोनेरी पान!


‘शेर शिवराज' चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध कसा केला? हे पहायला मिळणार आहे. प्रतापगड आणि अफझलखान यांचा खूप जवळचा संबंध आहे. राजांना जेरबंद करण्याच्या उद्देशानं भला मोठा फौजफाटा घेऊन सर्व तयारीनिशी खान प्रतापगडाच्या पायथ्याशी येऊन पोहोचला खरा, पण पुन्हा माघारी जाऊ शकला नाही. तिथेच त्याची कबर खोदली गेली. कारण खानाला शिवरायांच्या युद्धनीतीची, बुद्धीचातुर्याची, गनिमी काव्याची यासोबतच संयम, शिष्टाई आणि चतुराई या गुणांची जराही कल्पना नव्हती. शिवरायांच्या याच अद्भुत गुणांचं आणि अनोख्या युद्ध कौशल्याचं दर्शन 'शेर शिवराज' या चित्रपटात घडणार आहे.


हेही वाचा :