Shehnaaz Gill on Sidharth Shukla Death: अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla)चं काल हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. सिद्धार्थच्या मृत्यूनं संपूर्ण बॉलिवूडसह त्याच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. त्याचा परिवारासह चाहत्यांना अजूनही यावर विश्वास बसत नाही. यात सिद्धार्थ शुक्लाची जवळची मैत्रिण शहनाज कौर गिल (Shehnaaz Gill)ची प्रतिक्रिया काय असेल याकडं सर्वांचं लक्ष लागून होतं. शहनाजला सिद्धार्थच्या मृत्यूनं मोठा धक्का बसला आहे. शहनाजच्या वडिलांनी याबाबत माहिती दिली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार शहनाजनं आपल्या वडिलांना सांगितलं की,  'माझ्या हातात त्यानं जीव सोडला, मी आता कसं जगू.'


Sidharth Shukla Death : सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट; कोणावरही संशय नसल्याचं कुटुंबियांचं स्पष्टीकरण


अनेकदा शहनाजनं सिद्धार्थवरचं आपलं प्रेम जाहीर केलं होतं. सिद्धार्थच्या जाण्यानं ती पूर्ण तुटली आहे. शहनाजचे वडील संतोष सिंह यांनी सांगितलं की, 'सिद्धार्थच्या निधनानं शहनाज पूर्णपणे तुटली आहे. ती सतत रडत आहे. तिनं मला सांगितलं की, माझ्या हातात त्यानं जीव सोडला, जग सोडून गेला, मी आता कसं जगू, काय करु?' 



शहनाजच्या वडिलांनी सांगितलं की, 'शहनाज, सिद्धार्थला सकाळी झोपेतून उठवण्यासाठी गेली होती त्यावेळी त्यानं रिस्पॉन्ड केलं नाही. तिनं त्याला आपल्या हातावर घेतलं पण त्यानं रिअॅक्ट केलं नाही, त्यानंतर शहनाजनं सिद्धार्थच्या घरच्यांना बोलावलं. मग त्याला दवाखान्यात नेण्यात आलं.'  शहनाजच्या वडिलांनी सांगितलं की, 'मला माझी मुलगी मुंबईत एकटी राहत असल्याची कधीच चिंता नव्हती. कारण सिद्धार्थ तिची खूप काळजी घ्यायचा. 



आपल्याला कोणावरही संशय नसल्याचं सिद्धार्थच्या कुटुंबियांकडून स्पष्ट


सिद्धार्थ शुक्लाच्या अकाली निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून शवविच्छेदनानंतर ते स्पष्ट होईल. पण त्याचे अकाली निधन म्हणजे आत्महत्या आहे का, किंवा कोणी त्याचा खून केला का अशी चर्चा आता रंगली आहे. पण या चर्चांना पूर्णविराम देताना, आपल्याला कोणावरही संशय नसल्याचं सिद्धार्थच्या कुटुंबियांनी स्पष्ट केलंय. पोलिसांच्या सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे, सिद्धार्थच्या कुटुंबियांनी त्याच्या मृत्यूबद्दल अद्याप कोणावरही संशय व्यक्त केला नाही. त्यामुळे शवविच्छेदनानंतर त्याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. सिद्धार्थच्या मृतदेहाचे कूपर हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन होणार आहे.