England vs India Oval Test : इंग्लंड विरोधातील चौथ्या कसोटी सामन्याला आजपासून  सुरूवात झाली आहे.  पहिल्या दिवसअखेर इंग्लंडने पहिल्या डावात 3 बाद 53 धावा केल्या आहेत. तर भारतीय संघाला फक्त 191 धावांपर्यंत मजल मारता आली आहे. 


भारताकडून फक्त शार्दुल ठाकूरने चांगली कामगिरी केली आहे. शार्दुलने 36 बॉलमध्ये तीन षटकार आणि सात चौकार मारत 57 धावा केल्या. या शिवाय कर्णधार विराट कोहलीने 50 धावा केल्या. तर दुरीकडे इंग्लंडच्या क्रिस व्रोक्सने सर्वाधिक चार विकेट घेतले तर ओली रॉबिन्सननी तीन विकेट घेतले.


टॉस हरल्यानंतर प्रथम टीम इंडिया फलंदाजीसाठी मैदानात उतरली परंतु सुरुवातीलाच कामगिरी चांगली नव्हती. तर तिसऱ्या कसोटी सामन्यात शानदार कामगिरी करणारा चेतेश्वर पुजारा आज 4 धावा करत तंबूत परतला.  रोहितने 27 बॉलमध्ये एक चौकरासह 11 धावा केल्या तर केएल राहुलने 44 बॉलमध्ये तीन चौकरासह 17 धावा केल्या तर चेतेश्वर पुजाराने 31 बॉलमध्ये एका चौकारसह चार धावा केल्या. तर कर्णधार विराट कोहली 96 बॉलमध्ये आठ चौकारासह 50 धावा करत  आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 23,000 धावा करणारा फलंदाज बनला


धोनीचा विक्रम मोडला


ओव्हल कसोटीच्या पहिल्या डावात अर्धशतक झळकावताच विराट कोहली इंग्लंडच्या भूमीवर कर्णधार म्हणून 50 किंवा त्याहून अधिक धावा करणारा पहिला फलंदाज ठरला. त्याने या विक्रमामध्ये एमएस धोनीला मागे टाकले. विराट कोहलीने कर्णधार म्हणून सातव्यांदा इंग्लंडच्या भूमीवर 50 किंवा त्याहून अधिक धावांची खेळी केली आहे. त्याचबरोबर धोनीने हा पराक्रम केवळ सहा वेळा केला. इंग्लंडमध्ये हा पराक्रम करण्याच्या बाबतीत सौरव गांगुली तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने हे 4 वेळा केले.


संबंधित बातम्या :


IND vs ENG: विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 23,000 धावा करणारा फलंदाज बनला; धोनीचा 'हा' विक्रमही मोडला