Shashank Ketkar on Politics : अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar) हा झी मराठीवरील (Zee Marathi) होणार सून मी ह्या घरची (Hoonar Soon Me Hya Gharchi) या मालिकेतून घरोघरी पोहचला. त्याच्या श्री या पात्राने त्याला सिनेसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण करुन दिली. शशांने मराठी रंगभूमीसह रुपेरी पडद्यावरही आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. पण सध्या शशांक त्याच्या राजकारणावरील वक्तव्यामुळे चर्चेत आलाय. 


नुकतच शशांकने एका युट्युब चॅनलला दिलेल्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्याच्या या वक्तव्यावर चर्चा सुरु आहे. दरम्यान या सगळ्यामुळे अनेक राजकीय चर्चांना देखील उधाण आलं आहे. मी कलाकार होण्याआधी या देशाचा नागरिक आहे, त्यामुळे देशात ज्या काही राजकीय गोष्टी सुरु असतात, त्यावर माझं लक्ष असतं, असंही शशांकने म्हटलं. 


तसंही भाजपचं जिंकणार आहे - शशांक केतकर


सध्या देशात सुरु असेलल्या राजकीय परिस्थितीवर शशांकने भाष्य केलं आहे. स्टार प्रवाह पुरस्कारांच्यावेळी शशांकने तारांगण या युट्युब चॅनलला मुलाखत दिली. यावेळी त्याने म्हटलं की, अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर सध्या भाजपला या सगळ्याची गरज नाही. ते तसंही जिंकणार आहेत. हे माझं प्रांजळ मत आहे पण जिथे आपण जिंकून येऊ शकत नाही, अशी शंका असेल तिथे उमदेवार आल्या पक्षात घेणं हे सगळेच करत आलेत. पण याने जर जनतेची प्रगती होणार असेल तर तुम्ही कोणत्याही पक्षात घ्या आणि काढा पण देश चांगल्या पद्धतीने घडवा. 


शरद पवारही आयसीसीचे अध्यक्ष होते... - शशांक केतकर


दरम्यान यावेळी बोलताना शशांकने शरद पवारांवर भाष्य केलं आहे. त्याने म्हटलं की, मी एक व्हिडिओ पाहिला होता, त्यामध्ये म्हटलं गेलं की अमित शाह यांचा मुलगा बीसीसीआयचा अध्यक्ष कसा काय होऊ शकतो? त्याने कुठे क्रिकेट खेळलं होतं. मग माननीय शरदचंद्र पवार आयसीसीचे अध्यक्ष होते. ते तरी कुठे क्रिकेट खेळले होते. पण ज्ञान असणाऱ्या आणि त्यासाठी लागणारा बिझनेस आणू शकणाऱ्या योग्य व्यक्तीला त्या त्या जागी बसवलं जातं. 


सध्या शशांक हा स्टार प्रवाहवरील मुरांबा या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. तसेच शंशाकने ओटीटी माध्यमावरही काम केलं आहे. दरम्यान शशांक केतकरच्या या वक्तव्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.  






ही बातमी वाचा : 


Ananya Panday-Aditya Roy Kapur : डोहाळजेवणाचा कार्यक्रम अनन्याच्या बहिणीचा, पण सर्वांच्या नजरा आदित्य रॉय कपूरच्या हजेरीवर, सोशल मीडियावर चर्चांना उधाण