Sharad Ponkshe : मराठी चित्रपट, नाटक, मालिका या सगळ्यांमध्ये ज्यांनी आपल्या अभिनयाद्वारे कामाचा ठसा उमटवला आहे ते म्हणजेच ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक नवीन प्रोजेक्ट सुरु करण्याची माहिती दिली. शरद पोंक्षे नवीन प्रोजेक्टमध्ये दिसणार म्हटल्यावर चाहत्यांचीही उत्सुकता शिगेला पोहोचली. हा प्रोजेक्ट नेमका काय आहे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 


शरद पोंक्षे यांनी एक यू ट्यूब चॅनेल सुरु केलं आहे. या यू ट्यूब चॅनेलचं नाव 'राष्ट्राय स्वाहा' असं आहे. या नवीन चॅनेलच्या माध्यमातून शरद पोंक्षे हे राष्ट्रपुरुष आणि संतांचे विचार तमाम प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहेत. नुकतंच त्यांनी या संदर्भात ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. तसेच, या नवीन प्रोजेक्टचा पहिला एपिसोड त्यांच्या यू ट्यूब चॅनेलवर पाहायला मिळणार आहे. 


 






 


दिनांक 21 फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी सोशल मीडियाद्वारे एक व्हिडीओ शेअर करत नवीन प्रोजेक्ट सुरु करत असल्याची माहिती दिली होती. 


शरद पोंक्षे सध्या स्टार प्रवाहवरील ठिंपक्यांची रांगोळी या मालिकेत महत्वाची भूमिका साकारत आहेत. तसेच त्यांनी उंच माझा झोका, असे हे कन्यादान, राधा ही बावरी अशा अनेक मालिकांमधून महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच, 'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकातील त्यांची नथुरामची भूमिकाही प्रचंड गाजली होती.  शरद पोंक्षे यांना अनेक पुरस्कारांनीही गौरविण्यात आले आहे.


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha