Sharad Ponkshe : मराठी सिनेसृष्टीतील दर्जेदार कलाकारांपैकीच एक अभिनेते म्हणजेच शरद पोंक्षे (Sharad Ponkshe). आजवर अनेक मराठी चित्रपटांतून त्यांनी वेगवेगळ्या भूमिका बजावल्या आहेत. मग ते चित्रपट असो, नाटक असो अथवा मालिका. या तिन्ही माध्यमांतून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. आणि स्वत:चं वेगळेपण सिद्ध केलं आहे. शरद पोंक्षे यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. हा व्हिडीओ नेमका काय आहे ते जाणून घेऊयात.
या व्हिडीओमध्ये शरद पवार असं म्हणतात की, "नमस्कार, आजपर्यंत तुम्ही मला अभिनेता म्हणून पाहिलं आहे. दिग्दर्शक, निर्माता...माझी विविध भाषणं ऐकली आहेत. पण एक सुजाण नागरिक म्हणून त्याही पलिकडे जाऊन एका वेगळ्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचावंसं वाटतंय. ते काय आहे..लवकरच घेऊन येतोय. राष्ट्राय स्वाहा".
यावरून शरद पोंक्षे हे लवकरच एका नव्या माध्यमातून येणार हे मात्र निश्चित झालं आहे. पण ते माध्यम आणि ती भूमिका नेमकी कोणती असेल याबद्दल मात्र स्पष्ट सांगण्यात आलं नाही. तरी या व्हिडीओमुळे चाहत्यांची उत्सुकता मात्र शिगेला पोहोचली आहे हे नक्की.
शरद पोंक्षे सध्या स्टार प्रवाहवरील ठिंपक्यांची रांगोळी या मालिकेत महत्वाची भूमिका साकारत आहेत. तसेच त्यांनी उंच माझा झोका, असे हे कन्यादान, राधा ही बावरी अशा अनेक मालिकांमधून महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच, 'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकातील त्यांची नथुरामची भूमिकाही प्रचंड गाजली होती. शरद पोंक्षे यांना अनेक पुरस्कारांनीही गौरविण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Pawankhind Movie Review : शौर्याची आणि सर्वोच्च बलिदानाची गाथा!
- Me Vasantrao : 'मी वसंतराव' ची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला ; एक एप्रिल रोजी होणार प्रदर्शित
- Dadasaheb Falke International Film Festival Awards : 'शेरशाह' बेस्ट फिल्म तर रणवीर बेस्ट अॅक्टर; पाहा दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्यांची यादी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha