Bachchan Pandey : होळीच्या दिवशी म्हणजेच 18 मार्चला अक्षय कुमारची (Akshay kumar) प्रमुख भूमिका असलेला बच्चन पांडे (Bachchan Pandey)  हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील अक्षयच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. चित्रपटात अक्षय कुमारसोबतच अभिनेत्री कृती सेनन (kriti sanon), जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) आणि अभिनेता अरशद वारसी (Arshad Warsi) हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.  या चित्रपटाच्या टायटलचं   अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि चंकी पांडे (Chunky Panday) यांच्यासोबत खास कनेक्शन आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाच्या नावाबाबत...


अक्षयच्या खिलाडी 786 आणि रावडी राठोड या चित्रपटांच्या नावाप्रमाणेच बच्चन पांडे हे नाव देखील यूनिक आहे. चित्रपटाचे हे नाव ठेवण्यामागील कारण अक्षयनं सांगितलं आहे. अक्षयनं सांगितलं की बच्चन पांडे या चित्रपटाच्या नावाबरोबर चंकी पांडे आणि अभिषेक बच्चन यांच्यासोबत खास नातं आहे. जेव्हा अक्षयनं हाऊसफुल-4 या चित्रपटाच्या सक्सेस पार्टीमधील अक्षय आणि चंकीचा फोटो पाहिला तेव्हा त्याला ही आयडिया आली की या चित्रपटाचे नाव बच्चन पांडे असं ठेवावं.






सध्या बच्चन पांडे या चित्रपटाची टीम या चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. चला हवा येऊ द्या तसेच द कपिल शर्मा शोमध्ये जाऊन या चित्रपटाची टीम प्रमोशन करत आहे. 


संबंधित बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha