Sharad Ponkshe on Swatantra Veer Savarkar Movie :  अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) हे त्यांच्या हिंदुत्ववादी विचारांमुळे आणि सावरकरांवरील वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असतात. दरम्यान नुकताच रणदीप हुड्डा (Randeep Hooda) दिग्दर्शित स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantra Veer Savarkar) हा चित्रपट 22 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. पण हा चित्रपट अद्याप शरद पोंक्षे यांनी पाहिला नाही. नुकतच त्यांनी हा चित्रपट अद्याप न पाहण्याचं कारणही त्यांनी सांगितलं आहे.


सावरकरांच्या जीवनपट उलगडणारा स्वातंत्र्यवीर सावरकर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झालाय. मराठीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांना सुबोध भावेचा आवाज देण्यात आलाय. रणदीप हुड्डा याने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून सावरकरांची भूमिका देखील त्यानेच साकारली आहे. 


प्रत्येकाने पाहायला हवा असा - शरद पोंक्षे


शरद पोंक्षे यांनी फेसबुक पोस्ट करत या चित्रपटाबद्दल भाष्य केलं आहे. त्यांनी म्हटलं की, 'प्रत्येकाने पहायला हवा.मी दुसऱ्या सिनेमात व्यस्त आहे. म्हणून मला अजून बघणं जमलं नाही.पुढील दोन दिवसात मी बघून एक छान व्हिडिओ करून प्रसारित करणार आहे. हे सांगण्याचं कारण खूप लोक मला विचारताहेत की तुम्ही चित्रपटाबद्दल काही का बोलला नाहीत तर सिनेमा अधिक बघावा आणि मग सविस्तर त्यावर बोलावं असं ठरवलेलं आहे. पुढील चार दिवसात माझा व्हिडिओ येईलच.'



'स्वातंत्र्यवीर सावरकर' पहिल्या दिवसाचं कलेक्शन किती?


'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमांचं कौतुक होत असलं तरी बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा सिनेमा कमी पडल्याचं पाहायला मिळतंय. 'स्वातंत्र्यवीर सावरकर' (Swatantra Veer Savarkar Box Office Collection) या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी फक्त 1.15 कोटींची कमाई केली आहे. 


सावरकर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला


'स्वातंत्र्यवीर सावरकर'ची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा प्रोपगंडा असल्याचं म्हटलं जात होतं. त्यातच आज म्हणजेच 22 मार्च रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटासाठी रणदीप हुड्डाने जवळपास 30 किलो वजन कमी केल्याचं माझा कट्टावर सांगितलं होतं. त्यानंतर त्याचा एक फोटो देखील बराच चर्चेत आला होता.  त्यामुळे बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची घोडदौड कशी सुरु राहणार याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रणदीप हुड्डानेच केले आहे. 


ही बातमी वाचा : 


RRR Movie in Japan : जपानमध्ये RRRचा डंका! 110 वर्ष जुन्या थिएटर कंपनीने केलं म्युझिकल प्ले, टाळ्यांच्या कडकडाटात अन् स्टँडिंग ओवेशन देत राजामौली यांचा सन्मान