RRR Movie in Japan : एसएस राजामौली (SS Rajamouli ) यांचा RRR हा सिनेमा 2022 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. पण या सिनेमाची जादू अजूनही पाहायला मिळतेय. आता हा चित्रपट जपानमध्ये (Japan) प्रदर्शित करण्यात येत आहे. . एसएस राजामौली हे गेल्या काही दिवसांपासून जपानमध्ये आहेत, जिथे त्यांनी आरआरआरच्या स्क्रीनिंगला हजेरी लावली होती. या चित्रपटाने केवळ ऑस्करवरच आपली छाप पाडली नाही, तर आता जपानमध्येही या चित्रपटाने त्याचा जलवा दाखवला आहे. नुकतच हा चित्रपट जपानमध्ये ब्रॉडवे थिएटर म्हणून दाखवण्यात आला आहे.
RRR हा चित्रपट 110 वर्ष जुन्या थिएटर कंपनीकडून दाखवण्यात आला आहे. हे पाहून राजामौली यांना आनंद झाला आणि त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. एसएस राजामौली यांनी सांगितले की जपानच्या 100 वर्षांहून अधिक जुन्या थिएटर 'ताकाराजुका' ने त्यांचा चित्रपट RRR संगीत नाटक अडेप्ट केला आणि त्यावर सादरीकरण देखील केल्याचं सांगितलं. राजामौली यांनी ट्विटरच्या माध्यमातून थिएटर कंपनीच्या सदस्यांसोबत काही फोटो शेअर केले आहेत.
RRR चं म्युझिकल प्ले
राजामौली यांनी ट्वीट करत म्हटलं की, ही अत्यंत सन्मानाची गोष्ट आहे की, RRR चित्रपटाचे 110 वर्षे जुन्या Takarazuka या थिएटर कंपनीने म्युझिकल प्ले केलं आहे. चित्रपटाप्रमाणेच 'RRR' चे ब्रॉडवे नाटक स्वीकारल्याबद्दल आणि प्रेम केल्याबद्दल जपानी प्रेक्षकांचे आभार. तुम्ही मला दिलेल्या प्रतिक्रिया आणि प्रेमाने मी भारावून गेलो आहे. सर्व मुलींनी शोमध्ये अप्रतिम ऊर्जा आणि त्यांची प्रतिभा दाखवली.
एसएस राजमौली यांच्यासाठी स्टँडिंग ओवेशन
एसएस राजामौली यांनी एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये ते प्रेक्षकांमध्ये उभे आहेत, त्यांना शुभेच्छा देत आहेत आणि जपानी भाषेत धन्यवाद म्हणत आहेत. संपूर्ण नाट्यगृहात टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळाला. . संगीत नाटकानंतर लोकांनी एसएस राजामौली यांना स्टँडिंग ओव्हेशन देखील दिले. काही दिवसांपूर्वीच, एका 83 वर्षीय जपानी चाहत्याने एसएस राजामौली यांना एक हजार ओरिगामी क्रेन बनवून भेट दिल्या होत्या.