Shahrukh Khan first reaction on BMC and Mannat : मुंबईतील वांद्रे परिसरात असलेला अभिनेता शाहरुख खानचा 'मन्नत' हा बंगला चर्चेत आला आहे. या बंगल्यात दुरुस्ती आणि नूतनीकरणाचे काम सुरू आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) आणि वन विभागाला संतोष दौंडकर यांच्याकडून तक्रार मिळाली की हे दुरुस्तीचे काम काही नियमांचे उल्लंघन करून केले जात आहे. किनारपट्टी क्षेत्राशी संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ही तक्रार करण्यात आल्याचे सांगण्यात आले. नियमांनुसार, किनारपट्टी भागात बांधकाम आणि दुरुस्तीच्या कामासाठी विशेष परवानगी आवश्यक आहे, जेणेकरून पर्यावरण आणि समुद्रकिनाऱ्याची सुरक्षितता सुनिश्चित करता येईल. या तक्रारीनंतर, शुक्रवारी बीएमसी आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याची तपासणी केली आणि अहवाल तयार केला आहे. दरम्यान, याबाबत आता शाहरुख खानच्या मॅनेजरकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. 


महापालिकेची टीम पाहणीसाठी आल्यानंतर शाहरुखच्या मॅनेजरचं स्पष्टीकरण 


शाहरुखच्या मॅनेजरने स्पष्टीकरण दिले की, "कोणतीही तक्रार नाही. मन्नतमध्ये सुरू असलेले सर्व काम सर्व मार्गदर्शक तत्त्वे आणि नियमांनुसार केले जात आहे. सर्व आवश्यक कागदपत्रे तयार आहेत आणि संबंधित विभागांना उपलब्ध करून दिली जातील." 


शाहरुख खान आणि त्याचे कुटुंब सध्या मन्नतपासून काही अंतरावर असलेल्या पाली हिलमधील एका अपार्टमेंटमध्ये राहत आहेत. वृत्तानुसार, शाहरुखने हे अपार्टमेंट 24 लाख रुपये प्रति महिना भाड्याने घेतले आहे. असे म्हटले जात आहे की, मन्नतमध्ये दुरुस्ती आणि नूतनीकरणाचे हे काम सुमारे दोन वर्षे सुरू राहिल.


बीएमसीला अशी तक्रार मिळाली होती की, शाहरुख खानच्या मन्नत या बंगल्याच्या नूतनीकरणाच्या कामामध्ये कोस्टल रेग्युलेशन झोन (CRZ) कायद्याचं उल्लंघन केलं जात आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या एका अहवालानुसार, अधिकाऱ्यांची टीम या कथित उल्लंघनांची चौकशी करण्यासाठी तिथे पोहोचली होती. 'मन्नत' हे ग्रेड III लिगेसी स्ट्रक्चर (वारसाहक्क असलेली इमारत) आहे. अहवालानुसार, अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी केली आणि शाहरुख खान यांच्या कर्मचाऱ्यांशी भेट घेतली. असं सांगितलं जातं की, कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांना आश्वासन दिलं की सर्व आवश्यक नूतनीकरण परवाने व सहाय्यक कागदपत्रे लवकरच सादर केली जातील.




इतर महत्त्वाच्या बातम्या 


शाहरुखच्या मन्नत बंगल्यावर पोहोचली मुंबई महापालिकेची टीम, CRZ चे नियम तोडल्याचा आरोप; नेमकं प्रकरण काय?


1993 मधील ब्लॉकबस्टर गाण्याचा वाद, जो वाद संसदेत पोहोचला, 'त्या' एका स्टेपमुळे घामटा फुटला!