मुंबई: मुंबईच्या मालवणी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार (Mumbai Crime News) केल्याच्या धक्कादायक घटना घडली आहे. 14 वर्षीय शाळकरी मुलीवरती एका वाढदिवसाच्या पार्टीमध्ये दोन मुलांनी अत्याचार केल्याचा ही धक्कादायक घटना घडली आहे. मुलीचा जबाब घेऊन मालवणी पोलिसांनी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत दोन आरोपींना अटक केली आहे. मालवणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही आरोपी मुलीच्या ओळखीचे आहेत. वाढदिवसाच्या पार्टीमध्ये या दोन्ही आरोपीने अल्पवयीन मुलीला धमकावून तिच्यावर अत्याचार केलाची माहिती समोर आली आहे. ही घटना काही दिवसांपूर्वीची आहे, पीडित मुलीच्या कुटुंबीयांना माहिती मिळतात त्यांनी मालवणी पोलिसांकडे धाव घेतली, याप्रकरणी मालवणी पोलिसांनी तात्काळ पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत अत्याचार करणाऱ्या दोन्ही आरोपींना अटक केली आहे. (Mumbai Crime News) 

Continues below advertisement

पोलिसांनी या प्रकरणी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही शाळेत शिकणारी आहे. तिच्या ओळखीच्या एका व्यक्तीने तिला विश्वासात घेऊन तिच्यासोबत गैरवर्तन केले आहे. दुसऱ्या आरोपीनेही यात सहभाग घेतल्याचे समोर आले आहे. मुलीने घडलेला प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली आहे. मालवणी पोलिसांनी तक्रार दाखल करून पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला. दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.(Mumbai Crime News) 

 

Continues below advertisement