Bollywood : बॉलिवूडमध्ये 1993 साली एक ब्लॉगबस्टर सिनेमा रिलीज झाला होता, या सिनेमाने कमाईचे अनेक विक्रम मोडित काढले होते. या चित्रपटातील प्रेमचा ट्रायअँगल प्रेक्षकांना खूपच आवडला होता. विशेषतः या चित्रपटातील अभिनेत्रीसाठी हा चित्रपट एखाद्या वरदानासारखा ठरला. विशेष करून एक गाणं – ज्यावर प्रचंड वाद झाला, आणि ज्यामुळे चित्रपटाचं यश अधिकच वाढत गेलं.
त्या ब्लॉकबस्टर चित्रपटाचं नाव होतं ‘खलनायक’. प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई यांनी हा चित्रपट बनवण्यासाठी खूप मेहनत घेतली होती. शूटिंगदरम्यान अनेक अडचणी आल्या, पण त्यांनी हार मानली नाही आणि त्यांनी ठरवल्याप्रमाणेच चित्रपट रिलीज केला. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला. या चित्रपटात माधुरी दीक्षित, संजय दत्त आणि जॅकी श्रॉफ प्रमुख भूमिकेत होते. 90 च्या दशकातील हा सर्वात गाजलेला चित्रपटांपैकी एक ठरला. पण जितकी चर्चा चित्रपटाची झाली, त्याहून अधिक गाजलं त्यातील एक गाणं.
1993 मध्ये आलेल्या ‘खलनायक’ चित्रपटातील ‘चोली के पीछे क्या है’ हे गाणं आजही लोक विसरलेले नाहीत. गाणं जाहीर होताच संपूर्ण देशात प्रचंड गदारोळ झाला. या गाण्याचे बोल पारंपरिक विचारधारेला हादरवणारे होते. तब्बल 32 संस्थांनी या गाण्यावर आक्षेप घेतला होता, आणि काही ठिकाणी यावर बंदी घालण्याची मागणी झाली होती. तरीही हे गाणं इतकं लोकप्रिय ठरलं की विक्रम नोंदवले गेले. हे गाणं अलका याग्निक आणि इला अरुण यांनी गायले होते, तर सरोज खान यांनी कोरिओग्राफी केली होती.
अलका यागनिकचा आवाज अन् माधुरी दीक्षित थिरकली
या गाण्यात माधुरी दीक्षित आणि नीना गुप्ता यांनी एकत्र डान्स केला होता. दोघींच्या जोडीने स्टेजवर अक्षरशः आग लावली होती. गाणं इतकं गाजलं की एका आठवड्यात याचे 1 कोटीहून अधिक ऑडिओ कॅसेट्स विकले गेले – त्या काळात ही एक मोठी गोष्ट होती. माधुरीने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, गाण्यातील एक सीन शूट करत असताना तिला अक्षरशः घाम फुटला होता. त्या सीनमध्ये तिला कंबर हलवायची होती, डोळ्यांनी एक्सप्रेशन द्यायचं होतं आणि चेहऱ्यावर भाव ठेवायचे होते – हे सगळं एकाच वेळी.
चित्रपटात संजय दत्तने ‘बल्लू बलराम’ ची भूमिका साकारली होती. संजय आणि माधुरी यांची जोडीही प्रेक्षकांना खूपच आवडली होती. या गाण्याचे बोल आनंद बक्षी यांनी लिहिले होते, तर संगीत लक्ष्मीकांत-प्यारेलाल या प्रसिद्ध संगीतकार जोडीने दिलं होतं. नीना गुप्ता यांनी देखील त्यांच्या आत्मचरित्रात या गाण्याचा उल्लेख केला आहे – त्यांनी सांगितलं की त्या काळात हे गाणं किती बोल्ड आणि हटके होतं आणि त्याचा भाग होणं त्यांच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय अनुभव होता.
इतर महत्त्वाच्या बातम्या
तू हरलास म्हणजे आम्ही सगळे हरलो, अभिनेता तुषार घाडीगावकार याने आयुष्य संपवल्यानंतर सिनेसृष्टी हळहळली