Shahrukh Kajol: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan)  आणि अभिनेत्री काजोल (Kajol) यांच्या जोडीला प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते. ही जोडी प्रेक्षकांची ऑल टाइम फेवरेट जोडी आहे. 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' या चित्रपटामधील शाहरूख आणि काजोलच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. लवकरच हे रिल लाईफ रोमँटिक कपल एका आगामी चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 


रिपोर्टनुसार, काजोल आणि शाहरूख हे  रॉकी और रानी की प्रेम कहानी या आगामी चित्रपटामध्ये काम करणार आहेत. या चित्रपटामध्ये शाहरूख आणि काजोल हे कॅमियो रोल करणार आहेत. या चित्रपटात रणवीर सिंह, आलिया भट,  जया बच्चन, शबाना आझमी, धर्मेंद्र हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. शाहरूख आणि काजोल हे लवकरच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात करणार आहेत. या चित्रपटाचे शूटिंग मुंबईमध्ये होणार आहे. 






सात वर्षानंतर करणार कमबॅक 
2015 मध्ये रिलीज झालेल्या  'दिलवाले' या रोहित शेट्टीच्या चित्रपटामधील शाहरूख आणि काजोलची केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. त्यानंतर आता सात वर्षानं  रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटामधून ते प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. तसेच काजोलचा  'द लास्ट हुर्राह' हा चित्रपट देखील लवकरच रिलीज होणार असून शाहरूखचा पठाण हा चित्रपट रिलीज होण्याची देखील प्रेक्षक वाट पाहात आहेत.


संबंधित बातम्या