Shahid Kapoor : ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ (India’s Got Talent) हा रिअॅलिटी शो बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. या शोच्या वीकेंड स्पेशल एपिसोडमध्ये प्रत्येक आठवड्याला काही सेलिब्रेटी पाहुणे म्हणून या शोमध्ये येतात. या वीकेंडला बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि मृणाल ठाकूर (Mrunal thakur) यांनी ‘इंडियाज गॉट टॅलेंट’च्या मंचावर धमाका केला. शोमध्ये शाहिद आणि मृणाल त्यांच्या आगामी चित्रपट ‘जर्सी’च्या (Jersy) प्रमोशनसाठी पोहोचले होते.


शो मेकर्सनी इंडियाज गॉट टॅलेंटच्या वीकेंड एपिसोडचा प्रोमो व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शाहिद कपूर त्याच्या प्रसिद्ध गाण्यावर 'नागडा नगाडा'वर जबरदस्त भांगडा करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये शाहिदसोबत अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty), बादशाह (Baadshah) आणि मृणाल ठाकूर देखील भांगडा करताना दिसत आहेत. स्टारर्सचा हा दमदार डान्स परफॉर्मन्स पाहून प्रेक्षक टाळ्यांचा जोरदार वर्षाव करत आहेत.


पाहा पोस्ट :



शाहीद कपूर आणि मृणाल ठाकूर यांचा चित्रपट कोरोनामुळे बऱ्याच दिवसांपासून पुढे ढकलला जात होता. पण, आता हा चित्रपट 14 एप्रिलला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. शाहिद कपूरचा चित्रपट ‘जर्सी’ हा स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट आहे.


'जर्सी' हा टॉलिवूड सुपरहिट चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. 'जर्सी' सिनेमात शाहिद कपूर एका क्रिकेटरचे पात्र साकारणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन गौतम तिन्ननुरीने केले आहे. सिनेमात पंकज कपूरसोबत मृणाल ठाकूरदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शाहिद आणि मृणाल पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. सिनेमात मृणाल ठाकूर शाहिदच्या पत्नीची भूमिका साकारत आहे.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha