Atlee Become Father : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शकांमध्ये ॲटलीची (Atlee) गणना होते. ॲटली गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) आगामी 'जवान' (Jawan) सिनेमामुळे चर्चेत आहे. पण एटली आता एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. ॲटलीच्या घरी पाळणा हलला आहे. ॲटलीच्या घरी छोट्या पाहुण्याचे (Atlee Become Father) आगमन झाले आहे. 


ॲटलीची खास पोस्ट (Atlee Special Post)


ॲटलीने सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून चाहत्यांना छोट्या पाहुण्याची माहिती दिली आहे. त्याने पत्नी प्रियासोबचा फोटो शेअर करत लिहिलं आहे, "आई-वडील होण्यासारखं सुख या जगात दुसरं काहीच नाही. आमच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. आता आयुष्याच्या या टप्प्यावर नवीन प्रवासाची सुरुवात करण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत. खूप आनंद झाला आहे... सर्वांचे खूप-खूप आभार"






वडील झाल्याचा आनंद ॲटलीला गगनात मावेनासा झाला आहे. ॲटलीच्या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींसह चाहते कमेंट्स करत त्याला शुभेच्छा देत आहेत. काजल अग्रवालने लिहिलं आहे, "अभिनंदन... बाळाला आणि त्याच्या आई-बाबांना खूप-खूप प्रेम..तुम्हा तिघांनाही भेटण्याची मला इच्छा आहे. नीललादेखील त्याच्या मित्राला भेटायचं आहे". 


'जवान' कधी प्रदर्शित होणार? (Jawan Release Date)


दाक्षिणात्य सिनेसृष्टी (South) गाजवल्यानंतर ॲटली (Atlee) आता बॉलिवूडमध्ये झळकण्यासाठी सज्ज आहे. 'जवान' या सिनेमाच्या माध्यमातून ॲटली बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. शाहरुखचा 'पठाण' हा सिनेमा धुमाकूळ घालत असताना त्याच्या आगामी 'जवान' (Jawan) सिनेमाचीदेखील चाहत्यांना उत्सुकता आहे. जून महिन्यात शाहरुखने या सिनेमाची घोषणा केली होती. तेव्हापासून चाहत्यांना या सिनेमाची प्रतीक्षा आहे. हा सिनेमा 2 जून 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानसह दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपति आणि नयनतारादेखील झळकणार आहे. 'पठाण' सिनेमाचं शूटिंग संपल्यानंतर शाहरुखने 'जवान' सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. 'ॲटली' हा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक आहे. त्यामुळे त्याच्या 'जवान' सिनेमात प्रेक्षकांना काय पाहायला मिळणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Shahrukh Khan : शाहरुखचा नवा लूक सोशल मीडियावर व्हायरल, 'पठाण'नंतर अॅटली दिग्दर्शित सिनेमाचे शूटिंग सुरू