Shabana Azmi : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री शबाना आझमींना (Shabana Azmi) कोरोनाची लागण झाली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. अनेक कलाकारांनी शबाना आझमी यांच्या पोस्टवर कमेंट करत त्यांना काळजी घेण्यासाठी सल्ला दिला. पण प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक बोनी कपूर (Boney Kapoor) यांनी शबाना आझमी यांच्या पोस्टला केलेल्या कमेंटने अनेकांचे लक्ष वेधले. 


शबाना आझमी यांनी त्यांचा एक फोटो शेअर  करून कॅप्शनमध्ये त्यांना कोरोनाची लागण झाल्याबद्दलची माहिती चाहत्यांना दिली. शबाना आझमी यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिले, "माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कृपया चाचणी करून घ्या". या पोस्टला बोनी कपूर यांनी कमेंट केली, 'जावेद अख्तर साहेबांपासून लांब रहा' बोनी कपूर यांच्या या कमेंटची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. अनेकांनी बोनी यांच्या कमेंटला लाइक करून रिप्लाय देखील दिला आहे. 






लवकरच शबाना आझमी करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमात दिसणार आहेत. या सिनेमात रणवीर सिंह, आलिया भट्ट, धर्मेंद्र आणि जया बच्चन मुख्य भूमिकेत आहेत.


संबंधित बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha