Nia Sharma : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री निया शर्मा (Nia Sharma) सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो निया सोशल मीडियावर शेअर करते. नियानं एका मुलाखतीमध्ये तिच्या स्ट्रगल दरम्यानचे अनुभव शेअर केले. केलेल्या कामाचे पैसे मिळवण्यासाठी काय करावे लागते हे देखील नियानं सांगितले.  


नियाने मुलाखतीमध्ये सांगितले की तिचा एक शो संपल्यानंतर तिच्याकडे जवळपास नऊ महिने काम नव्हते. तिनं सांगितलं, 'तुम्ही तुमचे काम निट करता.पण तुम्हाला त्या कामाचे पैसे मागण्यासाठी विणवण्या कराव्या लगतात. मी हा अनुभव घेतला आहे. पैसे मिळवण्यासाठी मी भांडण देखील केले. मी पैसे घेण्यासाठी स्टूडिओ बाहेर थांबत होते. '
 
'मी लोकांना सांगत होते की माझे पैसे जोपर्यंत मला मिळत नाही. तोपर्यंत मी काम करणार नाही. मला केलेल्या कामाचे पैसे देण्यासाठी काही लोकांनी नकार दिला. पण मी ते पैसे त्यांच्याकडून मागितले. तेव्हा मी विचार केला की मला ब्लॅक लिस्ट केले तरी चालेल किंवा त्यांनी मला काम दिले नाही तर. माझे पैसे  मिळवण्यासाठी मी त्यांच्यासोबत लढले.', नियानं पुढे सांगितलं.






निया शर्माचे नाव छोट्या पडद्यावरील सर्वात जास्त कमाई करण्याऱ्या अभिनेत्रींच्या यादीत येते. 'एक हजारों में मेरी बहना है' या नियाच्या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली. तसेच  जमाई 2.0 या मालिकेतील निया आणि रवी दुबे यांच्या जोडी प्रेक्षकांना आवडली. 


महत्वाच्या बातम्या :


Pushpa : The Rise : अनेक आव्हानं, कठिण अडचणी; अल्लू अर्जुनच्या ब्लॉकबस्टर 'पुष्पा'ची पडद्यामागील गोष्ट


Bigg Boss 15: मी हरावी म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत स्टुडिओतील लोक प्रार्थना करत होते; विजयानंतर तेजस्वी प्रकाशची पहिली प्रतिक्रिया


Shark tank india : भारतातील पहिला बिझनेस रिअॅलिटी शो ठरतोय 'शार्क टँक इंडिया' जाणून घ्या या शो विषयी बरंच काही...


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha