Shabana Azmi : नवनिर्वाचित खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) हिच्यावर चंदीगढ विमानतळावर एका CISF महिला जवानाने कानशिलात लगावली. त्यानंतर वातावरण चांगलच तापलं. कंगनाने देखील नेमकं काय घडलं याविषयी तिच्या सोशल मीडियावरुन भाष्य केलं. त्यातच सिनेसृष्टीतून तिला कोणीच पाठिंबा देत नसल्याचंही कंगनाने म्हटलं. इतकंच नव्हे तर संगीतकार विशाल ददलानी याने त्या महिला जवानाला कामाची देखील ऑफर दिली. पण या सगळ्यात अभिनेत्री शबाना आझमी (Shabana Azmi) यांनी मात्र कंगनाची साथ दिल्याचं पाहायला मिळतंय. 


कंगना आणि जावदे अख्तर यांचा वाद काही नवा नाही. त्या दोघांमधले वाद सध्या कोर्टात देखील सुरु आहे. पण तरीही त्यांची पत्नी आणि अभिनेत्री शबाना आझमी यांनी कंगनासाठी एक्स पोस्ट केली आहे. जावेद अख्तर आणि कंगना यांच्यात सुरु असलेल्या वादाचा निकाल अजून लागायचा आहे. पण तरीही शबाना आझमी यांनी ही पोस्ट केली असल्याने सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु आहे.               


शबाना आझमी यांनी काय म्हटलं?


शबाना आझमी यांनी एक्स पोस्ट करत म्हटलं की, माझ्या मनात कंगनाविषयी अजिबात कोणतंही प्रेमनाही. पण तिला कानशिलात लगावली या गोष्टी मी सेलिब्रेट नाही करु शकत. जे लोक खरंच खूष त्यांच्यात मी सहभागी नाही होऊ शकत. पण जर सुरक्षारक्षकांनीच जर कायदा आपल्या हातात घेण्यास सुरुवात केली, तर आपल्यापैकी कुणीच सुरक्षित नाही. 






कंगना रणौतचे प्रकरण काय आहे?


दिल्लीला जाण्यासाठी 6 जून रोजी कंगना रणौत मंडीहून चंदीगड विमानतळावर पोहोचली होती.  सुरक्षा तपासणीदरम्यान कंगना रणौतला सीआयएसएफची जवान  कुलविंदर कौरने तिच्या कानशिलात लगावली. कंगनाने शेतकरी आंदोलनादरम्यान महिला आंदोलकांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्याच्या निषेधार्थ कुलविंदरने कंगनाला मारले. कुलविंदरला सेवेतून निलंबित करण्यात आले असून तिची चौकशी होणार आहे. 


ही बातमी वाचा : 


Kangana Ranaut Slap Case : कानशिलात लगावल्याची घटनेची कंगनाकडून अतिप्रसंग आणि इतर गुन्ह्यासोबत तुलना, म्हणाली त्या लोकांनी आता.....