NDA Cabinet Ministers List : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (9 जून) रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतील. त्यांच्या शपथविधी सोहळ्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील अनेक खासदारही शपथ घेऊ शकतात. राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये अनेक नावाची मंत्रिपदासाठी सुरु आहे. मित्रपक्षांसाठी भाजपला किमान 13 मंत्रिपदे द्यावी लागतील, अशी चर्चा आहे. टीडीपीने लोकसभा अध्यक्षांसह पाच मंत्रिपदांची मागणी केली आहे. यामध्ये महत्वांच्या खात्यांचा समावेश आहे. दुसरीकडे, मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी पंतप्रधानांना आपल्या मंत्रिमंडळातील युतीच्या साथीदारांचीही पूर्ण काळजी घ्यावी लागणार आहे. मात्र, भाजप महत्त्वाची मंत्रीपदे स्वत:कडे ठेवू शकते. मात्र, टीडीपी आणि जदयूला महत्वाची काही खाती जाणार आहेत, यात शंका नाही. 

जनता दल युनायटेडमधून 2 मंत्री होऊ शकतात

याशिवाय एनडीएचा आणखी एक महत्त्वाचा सहयोगी जनता दल युनायटेडलाही मोदी मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते. जेडीयूच्या दोन खासदारांना मंत्री केले जाऊ शकते, असे सांगितले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा खासदार लालन सिंह आणि राज्यसभा खासदार रामनाथ ठाकूर यांना केंद्रीय मंत्रीपदाची जबाबदारी मिळू शकते.

सध्या चर्चेत असलेली नावे पुढीलप्रमाणे आहेत

नावपक्ष
पीयूष गोयलभाजप
नारायण राणेभाजप
नितिन गडकरीभाजप
संदीपान भूमरे  शिवसेना शिंदे गट
प्रतापराव जाधवशिवसेना शिंदे गट
प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरेअजित पवार गट
जी किशन रेड्डीभाजप तेलंगाना
बंदी संजयभाजप तेलंगाना
एटाला राजेंद्रभाजप तेलंगाना
डी के अरुणाभाजप तेलंगाना
डॉ. के लक्ष्मणभाजप तेलंगाना
राम मोहन नायडूटीडीपी आंध्र प्रदेश
हरीशटीडीपी आंध्र प्रदेश
चंद्रशेखरटीडीपी आंध्र प्रदेश
पुरंदेश्वरीभाजप आंध्र प्रदेश
रमेशभाजप आंध्र प्रदेश
बाला शौरीजनसेना पार्टी
सुरेश गोपीभाजप केरळ
व्ही. मुरलीधरनभाजप केरळ
राजीव चंद्रशेखरभाजप केरळ
एल. मुरगनभाजप तमिळनाडू
के. अन्नमलाईभाजप तमिळनाडू
एच. डी. कुमारस्वामीजेडीएस कर्नाटक
प्रह्लाद जोशीभाजप कर्नाटक
बसवराज बोम्मईभाजप कर्नाटक
जगदीश शेट्टारभाजप कर्नाटक
शोभा करंदलाजेभाजप कर्नाटक
डॉ. सी. एन. मंजूनाथभाजप कर्नाटक

इतर महत्वाच्या बातम्या